कलाकार हेमंत दंडवते यांची ' सिमेंट काँक्रीट चेंबर ' संकल्पना

कलाकार हेमंत दंडवते यांची ' सिमेंट काँक्रीट चेंबर ' संकल्पना

 वेब टीम नगर,दि. १९ - ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेमार्फत  मुलभूत गरजा ‘गटार चेंबर’ बांधण्यात येतात. त्यासाठी खोदणे, वीटकाम, प्लास्टर, पाणी मारणे इत्यादी गोष्टींसाठी खूप वेळ लागतो , त्यात काही त्रुटी आढळून येतात. निकृष्ट दर्जाचे चेंबर कामे होतात, जसे अकुशल वीट काम, गुण्यात नसणे, चेंबर मधील तिरकस उतार, प्लास्टर कमी सिमेंट प्रमाण बांधकामावर पाणी न मारणे इत्यादी त्यामुळे चेंबरचे सिमेंट उखडून येणे, फुटणे, खचणे, तुंबणे असे प्रकार वारंवार होत असतात, परत वरीलप्रमाणेच काम करावे लागते म्हणून यासर्व गोष्टींचा विचार करुन नगर येथील हरहुन्नरी कलाकार समाजसेवक हेमंत दंडवते यांनी ‘तयार सिमेंट काँक्रीट गटार चेंबर डिझाईन केले आहे.

     हे चेंबर कॉक्रीट मिश्रित तीन विविध भागामध्ये मोल्डद्वारे कमी वेळात, उत्तम दर्जाचे व तांत्रिक गुणवत्ता या गोष्टी शक्य होतील. एकाच जागेवर चेंबरचे उत्पादन व पाणी भिजत उपचार करणे शक्य होईल. खेडोपाडी, शहरा मधून या रेडिमेड चेंबरची मागणीद्वारे वाहतुकीस सोपे कमी वेळेत जागेवर खड्ड्यात बसविणे सोपे होईल. ग्रामपंचायत, पालिका, महापालिका यांच्याकडूनच अधिकृत मागणीद्वारे पंतप्रधान भुयारी गटार योजना अंतर्गत हा प्रकल्प राबविता येईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींची बचत होऊन दर्जेदार कामे होतील, असा विश्‍वास दंडवते यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments