माझा बाप आमदार, खासदार, मुख्यमंत्री नव्हता, मला चॅलेंज करू नका : राम शिंदेंचा हल्लाबोल


वेब टीम : अहमदनगर
विधानसभा निवडणुकीतील पराभवावरून पराभूत उमेदवार आणि विखे परिवारात सुरु झालेला संघर्ष अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे.

पराभवाला जबाबदार असल्याचे एक तरी उदाहरण द्यावे, ऐसे आव्हान खासदार सुजय विखे यांनी दिल्यानंतर माजी मंत्री राम शिंदे यांनी त्यांनी थेट इशारा दिला आहे.

‘राम शिंदेचा बाप मुख्यमंत्री नव्हता, आमदार नव्हता, खासदार नव्हता. मी सर्वसामान्यांतून आलेलो आहे व जनतेने मला त्या वेळेला निवडून दिले आहे. सर्व पदे मी भोगली आहेत. पक्षाचेही योगदान त्यामध्ये आहे. त्यामुळे मला कुणीही मला चॅलेंज करू नये’, असे वक्तव्य राम शिंदे यांनी केले आहे.

नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजप उमेदवारांच्या पराभवाला जबाबदार असल्याचे एक तरी उदाहरण सांगा, असे आवाहन खासदार सुजय विखे यांनी केले आहे.

यावर शिंदे यांना विचारले असता त्यांनी विखेंना तहत इशाराच दिला आहे. राम शिंदे म्हणाले की, माझा बाप मुख्यमंत्री नव्हता, आमदार नव्हता, खासदार नव्हता. आम्ही कर्तुत्वाने पुढे आलो आहोत. जनतेने आम्हाला निवडून दिले.

आम्हाला जनाधार होता, त्यामुळे त्यांनी आम्हाला चॅलेंज देण्याचे काहीच कारण नाही आणि त्यांनी देऊही नये.आमचा पराभव झाला, या बाबत पक्षाने वरिष्ठ पातळीवर समिती नेमलेली आहे. ते त्याचा अहवाल देणार आहे.

त्यावेळी सर्व बाबी समोर येतीलच, असे सांगत आमच्यामध्ये कोणताही समेट झालेला नाही, असेही ते म्हणाले. राम शिंदे यांच्या इशाऱ्यानंतर आता विखे काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments