थंडी पुन्हा अवतरली
मुंबई ,महाबळेश्वर, नाशिक,नगर गारठले
वेब टीम नगर,दि.३० - मध्यंतरी गायब झालेल्या थंडीने पुन्हा आगमन झाले आहे महाबळेश्वरचा पारा चार अंशावर तर नाशिकचा पारा दहा अंशावर घसरला आहे. मुंबईच्या तापमानातही चार ते पाच अंशाने घसरण झाल्याने दिवसा रात्रीसह दिवसाही मुंबई गारठली आहे ,तर वेण्णालेक परिसरात दवबिंदू गोठण्यास सुरवात झाल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या च्या ठिकाणी येत्या आठवडा अखेर थंडीची पर्वणी लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
नगर नाशिकमध्येही पारा दहा अंशांच्या खाली गेल्याने तेथील थंडीही वाढली आहे . थंडीचे दिवस असल्याने शाळांच्या वेळा बदलण्यात याव्यात अशी मागणी पालकांकडून होत आहे. मुलं सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत असून त्यांना शाळेत पाठवणे पालकांसाठी जिकिरीचे झाले आहे.
सकाळी फिरायला जाणारेही उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
रब्बीच्या पिकांना फायदा
गारठा वाढल्याने रब्बीच्या पिकांना दिलासा मिळाला असून गव्हासाठी वातावरण पोषक होता असल्याचे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केले आहे.
0 Comments