बीड : दिवंगत भाजप नेते गाेपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने १२ डिसेंबर राेजी परळीजवळील गाेपीनाथ गडावर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध कार्यक्रमांचे आयाेजन केले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रथमच यानिमित्ताने पंकजा मुंडे कार्यकर्त्यांशी व जनतेशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती स्वत: पंकजांनी साेशल मीडियावरील पाेस्टद्वारे दिली.
सर्वात माेठा पक्ष बनूनही भाजप सत्तेपासून दूर राहिल्याने आता या पक्षातील सर्वच नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच पंकजा मुंडे यांचा बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाल्याने पंकजा समर्थक अधिकच अस्वस्थ आहेत. पंकजांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणीही त्यांच्याकडून जाेर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर १२ डिसेंबर राेजी पंकजा गाेपीनाथ गडावर शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे मानले जाते.
रविवारी (ता. १ डिसेंबर) सकाळी पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत 'लोकनेते मुंडे यांच्या जयंतीदिनी गोपीनाथगडावर भेटू' असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. या ठिकाणी पंकजा आपले मन मोकळे करणार असून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत. सत्ताबदल झाल्याने पंकजा भाजप साेडणार असल्याच्या वावड्याही उठल्या. मात्र, भाजप सोडण्याचा त्यांचा कुठलाही विचार नसून आपल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणे, नव्या जोमाने पुन्हा कार्य सुरू करणे असा त्यांचा मानस असल्याची माहिती पंकजांच्या निकटवर्तीयांनी दिली.
या पोस्टमध्ये पंकजा यांनी लिहिले आहे की...
नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे...
निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल ही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्व आपण सर्वजण पहात होता. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जवाबदारी माझी आहे.
0 Comments