मंत्री म्हणाले, देवानंच न्याय केला!



हैदराबाद : महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना पोलीस चकमकीत ठार मारण्यात आल्यानंतर तेलंगणचे कायदा मंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी पोलिसांचं कौतुक केलं. आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते मारले गेले. देवानंच न्याय केला. आरोपींना त्यांच्या कर्माची शिक्षा दिली, असं ते म्हणाले.

हैदराबाद बलात्कार प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले चार आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, पोलीस चकमकीत मारले गेले. हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं पोलिसांना त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. त्यानंतर राज्याचे कायदा मंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे. आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, ते चकमकीत मारले गेले. देवानंच त्यांना कर्माची शिक्षा दिली आहे, असं ते म्हणाले. पोलिसांजवळील शस्त्रे हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न आरोपींनी केला, असा दावाही त्यांनी केला.

Post a Comment

0 Comments