हैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळचे डाकू सुद्धा द्यायचे: उज्ज्वल निकम


मुंबई : हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचं पोलिसांनी केलेलं एन्काउंटर अयोग्य व कायद्याला धरून नव्हतं,' असं स्पष्ट मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे. 'झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे. पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोरही द्यायचे. पण शेवटी ते दरोडेखोरच होते,' असंही निकम यांनी सांगितलं.

हैदराबाद बलात्कार प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले चार आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, आज सकाळी पोलीस चकमकीत मारले गेले. या वृत्तामुळं सर्वसामान्य लोकांमध्ये आनंद व समाधान व्यक्त होत आहे. तेलंगणचे कायदामंत्री इंद्रकरण रेड्डी यांनीही या एन्काउंटरचं समर्थन केलं आहे. देवानंच न्याय केला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments