राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची शिवसेनेत घरवापसी ; उद्या प्रवेश होणार?
वेब टीम

मुंबई - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतण्याची शक्यता आहे. याआधी ही जेव्हा भुजबळांच्या शिवसेनेतील प्रवेशावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारण्यात आले तेव्हा वेळ येईल, तेव्हा सर्व कळेलच, अशी सूचक प्रतिक्रिया दिली होती. तेव्हापासूनच भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चेला उधाण आले आहे.

छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये यासाठी काही दिवसांपूर्वी नाशिकमधील शिवसैनिक मातोश्रीवर गेले होते. मात्र आता भुजबळ शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांशी शिवसेनेचे नेते सुभाष देसाईंची खबलतं झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे तब्बल 29 वर्षांनी भुजबळांची घरवापसीची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments