पवारांची साथ सोडताना राणा जगजितसिंह यांना अश्रू अनावर




वेब टीम
उस्मानाबाद - राष्ट्रवादीचे उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. यावेळी राष्ट्रवादी पक्षाला निरोप देताना राणा जगजितसिंह यांना अश्रू अनावर झाले. काळजावर दगड ठेवून आपण हा निर्णय घेत असल्याचे राणा जगजितसिंह यांनी सांगितले आहे.

शरद पवार माझे दैवत होते, आहेत आणि तसेच राहतील. पक्ष सोडला तरी पवार कुटुंबीयांशी आपले चांगले संबंध असतील. अतिशय जड अंत:करणाने मी हा निर्णय घेत आहे, असे म्हणत जगजितसिंह भावूक झाले.

जिल्ह्यातील शेतकरी आणि बेरोजगार युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे आणि उस्मानाबादमध्ये हक्काचे पाणी आणणे, यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments