वेब टीम
मुंबई - भाजपमध्ये जे लोक प्रवेश करत आहेत ते साधुसंत नाहीत. अनेकांवर आरोप आहेत. मात्र नंतर ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना मुख्यमंत्र्याकडून क्लिनचीट दिली जाईल, असा टोला भाजप नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. ते पक्षात घेण्याआधी नेत्यांना धुवून घेतात. आमची पार्टी विथ डिफरन्स आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की लोक चांगल्या लोकांना निवडून देतील, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
कोणीही विचार आणि तत्व पाहून पक्षात प्रवेश करत नाही त्यामागे त्यांचा स्वार्थ असतो. कोणालाही पदाची अपेक्षा असते. तर कोणाला सत्तेचे रक्षण पाहिजे असते. त्यामुळे पक्ष प्रवेश होत आहेत, असेही खडसेंनी म्हटले आहे.
दरम्यान, गेले अनेक दिवस मी राणेंच्या भाजप प्रवेशाविषयीच्या चर्चा ऐकत आहे. शिवसेनेच्या दबावाखाली राणेंचा प्रवेश थांबवण्याची गरज नाही, असेे त्यांनी सांगितले.
0 Comments