नवख्या सुमितवर फेडररची स्तुतिसुमने


वेब टीम : न्यूयॉर्क
टेनिस कोर्टचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॉजर फेडररने भारतीय टेनिसपटू सुमित नागलवर स्तुतिसुमने उधळली आहेत.

सध्या सुरु असलेल्या यूएस ओपन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सुमितची गाठ फेडररशी पडली होती.

या सामन्यात सुमितचा प्रभाव झाला असला तरी त्याने फेडररला पहिल्याच सेटमध्ये ६-४ अशी मात दिली होती. खुद्द फेडररनेच सुमितचं कौतुक केलं आहे.

सुमित बद्दल बोलताना फेडरर म्हणाला, ‘सुमितने आज चांगलाच खेळ केला. तो टेनिस कोर्टावर काय कमाल करू शकतो, हे त्याला चांगलं माहित आहे.

त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. पण या खेळात मोठे सरप्राईज नसतात. इथे सातत्य असणं महत्त्वाचं आहे. ‘

पहिल्या सेटबद्दल विचारले असता, ‘तो माझ्यासाठी खरंच कठीण सेट होता. सुमित फारच चांगल्या प्रकारे खेळला. त्यामुळे त्या सेटचं श्रेय त्यालाच द्यायला हवं.’ असं तो म्हणाला.

Post a Comment

0 Comments