धोनीने आता निवृत्ती घ्यावी : 'या' खेळाडूची मागणी


वेब टीम : दिल्ली
नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर माजी कर्णधार एम एस धोनीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्याचबरोबर अनेकांनी धोनीच्या निवृत्तीची मागणीही केली होती.

यामध्ये अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटूंसह चाहत्यांचाही समावेश होता. आता यामध्ये बंगाल क्रिकेट संघाचा कर्णधार मनोज तिवारी याचीही भर पडली आहे. धोनीचे भारतासाठी योगदान मोठे आहे. मात्र, आता नव्या खेळाडूंना संधी देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे धोनीने निवृत्ती घ्यावी असे मनोज तिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाला.

‘धोनीनेे भारतीय क्रिकेटसाठी अमुल्य योगदान दिले आहे. यात काही वाद नाही. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून धोनीच्या फलंदाजीमध्ये घसरण झाली आहे. मात्र भारताला इथून पुढील स्पर्धा जिंकायच्या असतील तर सर्वोत्तम संघाला मैदानावर उतरवायला हवे.

देशात सध्या अनेक प्रतिभाशाली क्रिकेटपटू आहे. या तरुणांना आता संधी मिळायला हवी. भारतीय संघ कोणाची खाजगी संपत्ती नाही. हा देशाचा संघ आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवावे.’ असेही मनोज तिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाला.

यापूर्वी सचिन तेंडुलकरनेही, धोनीने आता स्वत:हून निवृत्ती घ्यावी असे मत व्यक्त केले होते. तर बीसीसीआयने हा धोनीचा वैयक्तिक प्रश्न आहे असे म्हणले होते.

तसेच इथून पुढे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंतचा अधिक विचार केला जाईल असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments