समीक्षण
'ओल्या भिंती 'चा रंजक प्रयोग
अरुण नावाचा चित्रकार शालिनीच्या चाळीत राहत असतो शालिनी त्याच्यासाठी सुद्धा डबा तयार करत असते तसे भिंतीवर चित्र काढण्याचे एका ठिकाणचे काम पूर्ण होत आलेले असते कलेच्या साधनेसाठी अरुण अविवाहित राहिलेला असतो आणि शालिनी कडे येऊन तिच्या ओल आलेल्या भिंतीकडे पाहून मी जाण्याअगोदर ही भिंत छान रंगवून जाईल असे सांगत असतो.
एक दिवस मेघा घरी येते आणि ती शालिनीला तिच्याबरोबर तिच्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी न्यायला तयार असते , मात्र शालिनी या गोष्टीला नकार देते मेधा शालिनी राघव सोबत लिविंग रिलेशन मध्ये राहत असल्याचे सांगते ते ऐकून शालिनीला धक्का बसतो आणि ती मेघाला विचारते लग्न न करताच शालिनीच्या डोक्यात समाज काय म्हणेल याची चिंता सतावत राहते . इतक्यात मोबाईल वाजतो मेधा फोन उचलून पाहते, तो राजेशचा फोन असतो तसा तो शालिनी कडे देत मेघा म्हणते हे घे तुझ्या लग्न न केलेला नवऱ्याचा फोन आहे. शालिनी फोन बंद करते.
शालिनीला तिचा प्रियकर राजेश कडून दिवस जातात आणि एक दिवस तो शालिनीला म्हणतो की आपल्याला मूल नको मला करिअर करायचे आहे, असे म्हणून तो दुबईला जातो. तेव्हा शालिनी गर्भ ठेवण्याचा निर्णय घेते . त्यादरम्यान लोकं विनाकारण चौकशा करतील म्हणून शालिनी शिक्षिकेची नोकरीही सोडून देते. मुलगी झाल्यावर ती स्वतःच्या हिमतीवर तिचे पालनपोषण करते. या काळात मेघाने शालिनीची होणारी ओढाताण, तिचे एकाकीपण अनुभवलेले असते. निदान आता तरी तिने रूढीवादी विचारातून बाहेर पडून स्वच्छंदी जीवन जगावे असे वाटत असते . एक दिवस प्रिया शालिनी कडे डबा न्यायला आलेली असताना तिला मेघाचा फोन येतो . ती प्रियाला प्रेग्नेंट असल्याचं सांगते आणि राघव पण निघून गेला असे सांगते, तेव्हा प्रिया मेघाला तू आधी इथे ये असे सांगते.
मेघा आल्यानंतर, शालिनी एकटं राहायचं होतं ना तुला , याचीच मला भीती वाटत होती. जे दुःख माझ्या वाट्याला आले त्याच दुःखाला तुला सामोरे जावे लागणार असे म्हणून शालिनी खूप त्रागा करते आणि राघवला फोन कर असे म्हणते, मी त्याच्याशी बोलते. तेव्हा मेघा म्हणते त्याची काही गरज नाही तू एकटीने माझ्या संगोपन केलंस ना तसंच मीही करेन.
चित्रकार अरुण आणि शालिनी यांच्यातही भावनिक संबंध निर्माण झाले असल्याची कुणकूण मेधा आणि प्रिया या दोघींना लागते मग ते शालिनी आणि अरुणला एकत्र आणण्याचे प्रयत्न करू लागतात. याप्रसंगी बोलाचालीतून अरुणची भावनिक संबंध निर्माण झाल्याचे ते शालिनी कडून वदवून घेतात. एवढ्यात मेघाचा फोन वाजतो प्रिया पाहते आणि फोन न घेण्याबद्दल मेघाला खुणावते ., मात्र रागावचा फोन असल्याने मेघा फोन घेते आणि त्याला सांगते राघव तू स्वयंपाक करायला घे मी थोड्याच वेळात येते. हे संभाषण ऐकल्यावर शालिनी म्हणते म्हणजे आतापर्यंत जे घडले तो बनाव होता तर, तेव्हा त्या दोघी तुझ्या आणि अरुणच्या भावनिक संबंधाबद्दल तुझ्या मनातील भावनांची खातर जमा करण्यासाठी आम्हाला हे नाटक करावे लागले असे म्हणतात.
एव्हाना अरुणचे तिथले चित्र काढायचे काम संपत आलेले असते मेजावर बुद्धिबळाचा पट मांडलेला असतो. त्यातून बुद्धिबळाच्या चालीतून त्या एकमेकींचा निर्णय आजमावत असतात. दरवेळी माझ्यासाठी तू जाणून बुजून हरायचीस , मात्र आज माझे डोळे उघडलेस आणि तूच जिंकलीस असे शालिनी मेघाला म्हणते.
शालिनीला रोजच्या राजेशच्या येणाऱ्या फोनमुळे तिचे कुटुंब मिळाल्याचा अरुणचा गैरसमज होतो, तर मेघा अरुण कडून ही शालिनी बरोबर निर्माण झालेल्या भावनिक संबंधाबद्दल खातरजमा करून घेते. आणि त्याला शालिनीशी स्पष्ट बोलण्याचा सल्ला देते. तर अरुणचीआधीच झालेलया गैरसमजामुळे द्विधा मनस्थिती होते.
अरुण शालिनीच्या घरातील भिंतीवर चित्र काढतो त्यात काळ्या मेघांच्या मळभातून निरभ्रते कडे झेपावणारे काही पक्षी दिसतात, तर त्याच चित्रात एक स्त्री पक्षांप्रमाणे स्वच्छंदीपणे बागडू पाहते. एव्हाना अरुण जायला निघालेला असतो. तेव्हा मेघा शालिनीला बजावते तू आता पटकन निर्णय घे अरुण तुझ्या निर्णयाची खाली वाट बघतो आहे. शालिनी आजवर जपलेल्या रुढीवादातून घातलेले मंगळसूत्र कपाळावरची टिकली काढून टाकते आणि स्वच्छंदीपणे जगण्याचा निर्णय घेते.
अशा कथानका वर बेतलेले लेखक डॉ. सोमनाथ सोनवलकर लिखित संहितेला नानाभाऊ मोरे यांनी दिग्दर्शक म्हणून चांगला न्याय दिला. नाटकातील कबुतरांना उडवण्याचा प्रसंग चिमणीच्या घरट्यात गरज नसताना चिमण्याचे येणे या प्रसंगातून तसेच ठिबकणाऱ्या पाण्यामुळे भिंतीला ओल येणे या प्रसंगातून नाटकात दिग्दर्शक डोकावताना दिसत होता. या नाटकाचे नेपथ्य प्रसाद भणगे यांनी नाटकाच्या कथानकाला साजेसे असे उभे केले होते. नाटकाचे संगीत वैदेही देशमुख यांनी दिले त्यातून नाटक पुढे नेण्यास मदत झाली असेच म्हणावे लागेल. नाटकातील काही प्रसंगांना विशेष उठाव देताना कोसळणारा पाऊस, ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज, चिमण्यांचा किलबिलाट आणि कबुतरांचा आवाज या माध्यमातून कित्येक प्रसंगात कथानक पुढे सरकत होते. नाटकाची प्रकाशयोजना संहितेला पूरक अशीच होती. नाटकाची रंगभूषा ,वेशभूषा, केशभूषा या सगळ्या जबाबदाऱ्या चंद्रकांत सैंदाणे, अंजना मोरे ,अनुजा कांबळे यांनी अत्यंत चोखपणे बजावल्या.
आजच्या जगात सिंगल मदर म्हणून मुलीला जन्म देऊन तिचा सांभाळ करताना जबाबदारी पेलताना होणारी दमछाक व स्वतःचा होणारा भावनिक कोंडमारा समाज काय म्हणेल, समाजातील बंधने या ओझ्याखाली दबलेली शालिनी या भूमिकेला वैशाली गोस्वामी यांनी योग्य न्याय दिला . मेघा बद्दल काळजी करण्याचा तिचा स्वभाव शालनीच्या भूमिकेत त्यांनी उत्तमरीत्या वाटावला, तर मेघाच्या भूमिकेत राजसी भणगे आणि प्रियाच्या भूमिकेत अस्मि चावक उत्तम रित्या वावरल्या, चित्रकाराची अरुण ही भूमिका शैलेश देशमुख यांनी समर्थपणे पेलली . प्रियाच्या भूमिकेत अस्मि चावक हिने शालिनी आणि मेघा यांच्या समन्वय घडवून आणण्याची भूमिका अत्यंत योग्यरीत्या सांभाळली.
एकूणच ६५ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या शुभारंभाचा या प्रयोगाचे नेटके सादरीकरण झाले 'ओल्या भिंतीं' हे नाटक रंजक झाले. पण रूढीवादी विचारांमुळे अनेकदा माणूस आपल्या भावना दाबून ठेवतो. या दाबलेल्या भावनांमुळे त्याच्या मनाच्या भिंती कायम ओल्या राहतात.असा संदेश देणारं 'ओल्या भिंती 'हे नाटक प्रेक्षकांना भावलं .






0 Comments