अमित शाहांचा पुणे दौरा, काँग्रेसचा राडा आणि पोलिसांची धरपकड

अमित शाहांचा पुणे दौरा, काँग्रेसचा राडा आणि पोलिसांची धरपकड


पुणे : अमित शाहांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसने कडाडून विरोध केल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड  केली. यामुळे पुण्यात तणावाचे वातावरण होते.

 देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यात आहेत. पण शहरात हायव्होल्टेज ड्रामा सुरू झालाय! दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद थेट पुण्यात उमटले आहेत. शाह यांच्या दौऱ्याला काँग्रेसने काळे झेंडे दाखवण्याचा आणि जोरदार विरोधाचा इशारा दिलाय. त्यामुळेच, कोणतीही रिस्क न घेता पुणे पोलिसांनी थेट काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांची धरपकड केली होती.

परवा रात्रीपासूनच पुणे पोलिसांनी शहरात जबरदस्त फिल्डिंग लावली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युवक काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना थेट त्यांच्या घरातूनच ताब्यात घेण्यात आलं आहे. काँग्रेस कार्यकर्ते राहुल शिरसाट यांना पोलिसांनी घरातून उचललं. यासोबतच,अक्षय जैन,गौरव बाळंदे,सद्दाम शेख आणि राजू ठोंबरे या कार्यकर्त्यांनाही काल रात्रीच येरवडा भागातून ताब्यात घेण्यात आलंय. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.

अमित शाह यांच्या दौऱ्याआधीच काँग्रेस-भाजप आमनेसामने


थोडक्यात सांगायचं तर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना काल अमित शाहांच्या हस्ते ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ दिला गेला. पण दिल्लीत जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी आणि मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली उत्सव हॉटेल चौकात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलीय. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्तेही निदर्शने करत होते.

अमित शाह इस्तीफा दो”; काँग्रेसची सोशल मीडियावरून जोरदार मोहीम

दुसरीकडे, पुण्यातील राजकारण आणखीच तापलं आहे. कारण, काँग्रेसला जशास तसं उत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्तेही त्याच चौकात जमले आहेत. त्यामुळे पुण्यात मोठा राडा होण्याची शक्यता होती. दरम्यान, कटारिया महाविद्यालयातील कार्यक्रमस्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता , डॉग स्क्वॉडद्वारे संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली होती.


Post a Comment

0 Comments