रिपाइं (आंबेडकर) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या आदेशाने आ. संग्राम जगताप यांना जाहीर पाठिंबा
नगर: अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना आर पी आंबेडकर पक्षाचा जाहीर पाठिंबा दिला असून माजी आमदार अरुण काका जगताप यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी आंबेडकर चळवळीचे नेते अजय साळवे जिल्हा संपर्क प्रमुख बंडू आव्हाड, युवक शहराध्यक्ष संदीप वाघमारे, शहराध्यक्ष हरीश अल्हाट, आकाश कदम, जीवन पाटोळे, दिनेश पंडित, अविनाश वानखेडे, कार्याध्यक्ष. सतीश कांबळे, आकाश कदम, रवी आंग्रे, मनोज साठे, सचिन शेलार, राजू घोडके, रुपेश शेलार, प्रदीप शेलार, प्रवीण शर्मा,रोहित आव्हाड आदि उपस्थित होते.
माजी आमदार अरुण काका जगताप म्हणाले की शहरातील नागरिकांच्या सुखदुःखामध्ये नेहमीच जगताप कुटुंबियांनी सहभाग घेतला आहे तसेच आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या १० वर्षांमध्ये विकासाच्या कामाबरोबरच माणसे जपण्याचे काम केले आहे .
दररोज युवक नागरिक महिला मोठ्या संख्येने विधानसभा निवडणुकीमध्ये पाठिंबा देत आहे सर्वांच्या माध्यमातून शहर विकासाचे सुरू असलेले काम अखंडितपणे सुरू राहील, असे ते म्हणाले.
बंडू आव्हाड म्हणाले की आंबेडकर चळवळीतील नागरिकांचे प्रश्न आमदार संग्राम जगताप यांनी सोडविण्याचे काम केले आहे.
0 Comments