डाळ मंडई ही महाराष्ट्रातील अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखली जाते
आ. संग्राम जगताप : विकास यात्रेच्या माध्यमातून मंगलगेट परिसरामध्ये नागरिकांशी साधला संवाद
नगर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ शहरामध्ये फिरत असताना मिळत असलेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे माझा विजय निश्चित झाला असून पुढील पाच वर्ष आपण सर्वजण मिळून शहर विकासाला गती देऊ त्या माध्यमातून विकसित शहर निर्माण करू त्यामुळे मोठमोठे उद्योग कारखाने आपल्या शहरात एमआयडीसी मध्ये येतील त्या माध्यमातून युवक युवतींना रोजगार उपलब्ध होईल व आपल्या शहराची आर्थिक उन्नती झपाट्याने वाढेल डाळ मंडई ही महाराष्ट्रातील अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखली जात आहे.
झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे शहराचे विस्तारीकरण वाढत असून व्यापारीकरणाला अजून गती प्राप्त होईल असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी विकास यात्रेच्या माध्यमातून मंगल गेट परिसरामध्ये नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती सचिन जाधव, वर्चस्व ग्रुपचे अध्यक्ष सागर मुर्तडकर, माजी नगरसेविका अश्विनी जाधव, योगेश गलांडे, डॉक्टर विजयकुमार भंडारी, कमलेश भंडारी,सुनील लालबोंद्रे,रविंद्र लालबोंद्रे, सलोनी शिंदे, विमल परदेशी, दिगंबर गेट्याल, सुनील खताडे, प्रल्हाद जोशी, विनोद शिरसाट, समीर गवळी, वैभव काळे, सुनील भिंगारदिवे, मयूर कटारिया, अभिषेक भोसले, मयूर मैड आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगलगेट, वंजार गल्ली, डाळ मंडई, मंगळवार बाजार, सर्जेपुरा, तेलीखुंट, रामवाडी, कोठला परिसर, लालटाकी परिसरातील नागरिकांशी संवाद यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला,
0 Comments