विकास कामातून समृद्ध नगरची निर्मिती करू
माजी .खा.डॉ. सुजय विखे पाटील : अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ प्र.क्र.२ मध्ये विकास यात्रा संपन्न
नगर : आमदार संग्राम जगताप व मी शहर विकासाची संकल्पना हाती घेऊन मुहूर्तमेढ रवली आणि विकासाच्या योजना यशस्वीपणे राबवल्या या पुढील काळात चांगले काम उभे करू आणि समृद्ध नगरची निर्मिती करू. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती पूर्णपणे सज्ज आहे आणि ते महायुतीचे उमेदवार असले तरी ते माझे मित्र आहेत.
अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून आमदार संग्राम जगताप 50 हजार मतांनी विजयी होतील. त्यांनी माझ्या लोकसभा निवडणुकीमध्ये चांगले काम केले असल्यामुळे मला कठीण परिस्थितीत देखील 35 हजार मतांचे मताधिक्य दिले होते. आता तर चांगले वातावरण आहे शहरात ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले जाते त्यांनी केलेल्या विकास कामावर नगरकरांनी विश्वास ठेवला असल्याचे प्रतिपादन माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केले
अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक २ मध्ये विकास यात्रा संपन्न झाली. यावेळी मा.खा.डॉ. सुजय विखे पाटील मा. नगरसेवक निखिल वारे, विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, रूपालीताई वारे, संजय बुधवंत, सचिन लोटके, श्रीकृष्ण पवार, विशाल नाकाडे, धीरज उकिरडे, राहुल सांगळे, वैभव पोकळे, बाबासाहेब घुले, महेश तवले, संपत नलवडे, अनिल ढवण, नितीन शेलार, कैलास गर्जे, योगेश पिंपळे, निखिल त्रिंबके, सुमित जायभाय, सचिन गाडे, राजू बुधवंत, आदीसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments