मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ‘कौमी एकता सप्ताह’
व्याख्यानमाला व विविध स्पर्धांचे आयोजन
नगर - मखदुम एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी व मराठा सेवा संघाच्यावतीने स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त कौमी एकता सप्ताहाचे 9 ते 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मख़दुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान व मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजि. अभिजीत एकनाथ वाघ यांनी दिली.
या सप्ताहाचा शुभारंभ शनिवार दि.9 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता डॉ अल्लामा इकबाल यांच्या जयंती राष्ट्रीय उर्दु दिनी अलकलम अकॅडमी लखनौ च्या संयुक्त विद्यमाने महफिले मुशायरा ने होणार आहे.
सोमवार 11 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता अहमदनगर च्या भुईकोट किल्यात नेताकक्ष मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना अभिवादन केले जाणार आहे. मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुकुंदनगर येथील मौलाना आझाद हायस्कुल मध्ये प्रा. डॉ. महेबुब सय्यद यांचे पहिले व्याख्यान होईल. तर दुसरे पुष्प प्रा.डॉ.अब्दुस सलाम सर हे बुधवार 13 नोव्हेंबर रोजी आलमगीर येथील मातोश्री उर्दू हायस्कूल येथे सकाळी दहा वाजता गुंफतील. शेवटचे व्याख्यान गुरुवार 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता माणिक चौक येथील चॉद सुलताना हायस्कूल येथे प्रा.डॉ.महेबुब सय्यद यांच्या व्याख्यानाने होणार आहे.
तसेच या सप्ताहा मध्ये चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा व वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून,या सर्व स्पर्धा शहरातील विविध शाळेत घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा 4 थी ते 6 वी, 7 वी ते 9 वी व 10 वी ते 12 वी या तीन गटात होणार आहे.या व्यतिरिक्त अलकरम हॉस्पिटल तर्फे विविध आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती मख़दुम सोसायटीच्या सचिव डॉ कमर सुरुर यांनी दिली.
तरी या सप्ताहातील विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी व व्याख्यानमालेचा नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष सय्यद खलील व सचिव निसार बागवान यांनी केले आहे.
0 Comments