'एकदीप अत्याचारा विरोधात कर्तुत्व गाजवणाऱ्या स्त्रियांसाठी'

'एकदीप अत्याचारा विरोधात कर्तुत्व गाजवणाऱ्या स्त्रियांसाठी'


भाऊबीज निमित्त श्री एकदंत गणेश मंडळाचा दीपोत्सव

नगर- सध्या स्त्रियांवर होणारे अत्याचार प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे, अशा परिस्थितीत सुद्धा स्त्री निर्भयपणे उभी राहून या अत्याचारा विरोधात लढा देत आहे. तिच्यावर अत्याचार झाले तर ती दुर्गाचे रूप धारण करून अत्याचारा विरोधात आवाज उठवत आहे अशा या कर्तुतवान स्त्रियांसाठी श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने भाऊबीज निमित्त एक दिवा या कर्तुत्ववान महिलांसाठी लावून हा दीप उत्सव साजरा करण्यात आला.

      दातरंगे मळा येथील श्री एकदंत कॉलनीमध्ये दीपावली भाऊबीज निमित्त श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी ११११ दीप लावून वेगवेगळे विषय घेऊन हा दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या वर्षी मंडळाने महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी व जागृतीसाठी आणि ज्या महिला अत्याचारा विरोधात कर्तृत्व बजावून आपले संरक्षण करून इतरांनाही जागृत करणाऱ्या व अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या महिलांचा विषय घेऊन हा दीप उत्सव साजरा करण्यात आला.   

    यामध्ये मंडळांनी सुंदर अशी रांगोळीच्या माध्यमातून स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात स्त्री कठीण प्रसंगी दुर्गा देखील होते व ती अत्याचारी वृत्तीचा नाश करते, अशी संदेश देणारी भव्य रांगोळी काढून त्याभोवती विविध स्लोगन काढण्यात आले. त्यामध्ये वो धारा भी है... वो शिव की जटा भी है.... वो बहती गंगा भी है.... वो दुर्गा भी है..., इतिहास के पन्ने दुबारा नही दोहराएंगे.... हत्यार उठालो द्रोपती कान्हा नही आयेंगे..., लेहरा दिया आजादी वाला तिरंगा जिस रस्सीसे...अब उसी से न्याय भी दे दो.... असे जागृती पर घोषवाक्य रांगोळीच्या माध्यमातून रेखाटून त्या भोवती दीप उजळविण्यात आले. स्त्रियांवरील होणारे अत्याचार विरोधात लढणारे आंदोलनाचे अनेक छायाचित्र यावेळी लावण्यात आल्या. 

      यावेळी श्री एकदंत गणेश मंदिरात श्री गणेशाची महाआरती करून ११११ दीप प्रज्वलित करण्यात आले. या भाऊबीज दीपोत्सवाचे मंडळाचे हे 13 वर्ष असून प्रत्येक वर्षी मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय घेऊन समाजात जागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न असतो. मागच्या वर्षी स्वराज्यासाठी ज्या मावळ्यांनी रक्ताची आहुती दिली अशा सर्व मावळ्यांसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी दीपोत्सव साजरा करण्यात आला होता.      दीपोत्सव पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मंडळ दरवर्षी दीपोत्सव वेगवेगळ्या विषय घेऊन साजरा करत असल्याने नागरिकांनी  उत्सवाचे कौतुक केले. 

      हा उत्सव यशस्वी करण्यासाठी श्री एकदंत गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि महिला मंडळाच्या सर्व महिलांनी विशेष परिश्रम घेतले. 

Post a Comment

0 Comments