संग्राम जगताप यांच्या नामनिर्देशन अर्जावर महाविकास आघाडीची हरकत

 संग्राम जगताप यांच्या नामनिर्देशन अर्जावर महाविकास आघाडीची हरकत 

नगर : महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम जगताप यांच्या नामनिर्देशन अर्जावर महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार किरण काळे यांनी हरकत घेतली होती. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावत घोषित केल्याप्रमाणे दुपारी तीन वाजता सुनावणीस  सुरुवात झाली . 

यावेळी किरण काळे यांच्या वतीने ज्येष्ठ विविध अभिजीत पुप्पाल यांनी बाजू मांडली. तर संग्राम जगताप यांच्या वतीने ज्येष्ठ विविध सुभाष काकडे, ॲड. प्रसन्न जोशी यांनी बाजू मांडली. 

किरण काळे यांनी हरकतदार म्हणून स्वतः देखील यावेळी आपले म्हणणे मांडले. यावेळी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला. जोरदार युक्तिवाद झाल्यामुळे निकालाकडे आता शहराचे लक्ष लागले आहे. 


त्यामुळे अद्याप पर्यंत संग्राम जगताप यांचा अर्ज वैध ठरविण्यात आलेला नाही.निकाला नंतरच स्पष्ट होणार आहे की नेमका अंतिम निर्णय काय होतो. दरम्यान, सकाळच्या सत्रात झालेल्या छाननी प्रक्रियेत बंडखोर उमेदवार किरण काळे यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments