दिवाळी अंकाचा दीपोत्सव जीवन प्रकाशमान करणारा
प्रा. शिरीष मोडक : अहिल्यानगर वाचनालय दिवाळी अंकाचे स्वागत व वितरण
अहिल्यानगर - भारतीय संस्कृतीचा प्रकाशाचा उत्सव उंबरठ्यावर येऊन ठेपला असताना सर्वत्र धामधूम आहे. या आनंदाच्या वातावरणात दिवाळी अंकाच्या माध्यमातून मिळणारा विचारांचा, आनंदाचा ,दीपोत्सव खर्या अर्थाने जीवन प्रकाशमान करणारा असल्याचे उद्गार अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक यांनी काढले .अ नगर वाचनालयात दीपावली निमित्त रसिक वाचकांसाठी आलेल्या दिवाळी अंकाचे स्वागत व वाचकांना वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्राध्यापक मोडक बोलत होते . कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय निरीक्षक रामदास शिंदे, वाचनालयाचे उपाध्यक्ष दिलीप पांढरे ,संचालक किरण अग्रवाल ,प्राध्यापक ज्योती कुलकर्णी ,शिल्पा रसाळ, अजित रेखी, कवि चंद्रकांत पालवे उद्योजक व वाचक सभासद नंदकुमार आढाव अभिजीत भळकट अशोक दाणी, सखाराम गोरे, सदाशिव मुरूमकर, विठ्ठल पाठक, ग्रंथपाल अमोल इथापे, सहाय्यक ग्रंथपाल नितीन भारताल ,कुमारी पल्लवी कुक्कडवाल आदींसह वाचक सभासद उपस्थित होते.
उद्योजक नंदकुमार आढाव यांनी याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना अ नगर जिल्हा वाचनालयाने दिवाळी अंकाचा समृद्ध वारसा रसिक नगरकरांसाठी सुरू ठेवला आहे. उगवती तरुण पिढी ,ज्ञानदान करणारे गुरुजन व रसिक वाचकांनी याचा फायदा घेऊन खर्या अर्थाने विचारांचा दीपोत्सव साजरा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.शिल्पा रसाळ यांनी यावेळी माहिती देताना अहिल्यानगर जिल्हा वाचनालयात यावर्षी जत्रा ,खटकट लोकप्रभा, मार्मिक, तसेच पाककृती, महिला विषयक, विनोदी, आरोग्य ,भविष्य ,कथा ,व्यंगचित्र तसेच बालकांसाठी असंख्य प्रकारचे प्रसिद्ध दिवाळी अंक उपलब्ध करून रसिक वाचकांसाठी एक मेजवानी दिली असल्याचे सांगितले.
यावेळी प्रा.ज्योती कुलकर्णी यांनी येणार्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी व अहिल्यानगर जिल्हा स्वीप समिती यांच्या विद्यमाने आयोजित प्रबोधनात्मक मतदान प्रतिज्ञा यांचे सामूहिक प्रतिज्ञा घेतली. उपस्थि मान्यवरांचा सन्मान प्राध्यापक मोडक ,दिलीप पांढरे यांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन शिल्पा रसाळ तर आभार संचालक किरण अग्रवाल यांनी मानले.यावेळी वाचक सदस्य तसेच वाचनालयाचे संजय गाडेकर, सौ वर्षा जोशी, संकेत फाटक, निखिल ढाकणे , शेख सिकंदर आदींसह वाचक उपस्थित होते.
0 Comments