प्रगत विद्यालयाचा श्रेयस गाडे याची वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुणे विभागात प्रथम

 प्रगत विद्यालयाचा  श्रेयस गाडे याची वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुणे विभागात प्रथम 

 यश कदम यांची पिप साईड रायफल शूटिंग स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

नगर- अहिल्यानगर जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत येथील प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकणारा चि श्रेयस गाडे या विद्यार्थ्यांची वेटलिफ्टिंग स्पर्धेत विभागात प्रथम आला त्याने डिव्हिजन 67 किलो वजन वयोगट 19 वर्षांमध्ये विभागात प्रथम येण्याचा मान मिळवला त्याची आठ नोव्हेंबर रोजी होणार्‍या राज्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली.

       तर विद्यालयातील चि यश राहुल कदम याने नगर जिल्हास्तरीय पिप रायफल शूटिंग स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला व त्याची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. या दोन्ही विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक   दिलीप रोकडे यांचे मार्गदर्शन लाभले   

  संस्थेचे अध्यक्ष श्रीमती विजया रेखे, उपाध्यक्ष चंद्रशेखर वाल्मीक कुलकर्णी, प्रगत विद्यालयाचे चेअरमन उमेश रेखे, कार्यकारणी सदस्य किरण वैकर,  महेश रेखे, उदयकुमार भणगे, माजी अध्यक्ष दि.ना. जोशी, विद्यालयाचे प्राचार्य सुनील पंडित, प्राथमिक च्या मुख्याध्यापिका प्रतिभा धरम, प्रा. देशमुख हर्षाली, विजय गरड, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे आदींनी अभिनंदन केले . व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .



Post a Comment

0 Comments