निमित्त शिवजयंतीचे
शिवरायांचे अष्ट प्रधान मंडळ आणि त्यांच्या मोहोरा
मराठा प्रशासनाचे मुख्य व प्रमुख अंग म्हणून "अष्टप्रधान" मंडळ मानले होते.छत्रपती शिवाजी महाराज यांनी या अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती. सन १६७४ मध्ये राज्याभिषेकाच्या अगोदर या मंडळाची निर्मिती झाली होती.परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी या मंत्रिमंडळाचा अंतिम मसुदा तयार करून त्याला पूर्णत्व प्राप्त करून दिले.त्यामध्ये प्रत्येक पदाचे नाव संस्कृतमध्ये लिहिले गेले.त्या पदाचे अधिकार ठरवून त्याच्या कामाचे ताबतेही तयार केले गेले. या प्रमाणे अष्टप्रधान मंडळाच्या पदांची नावे खालील प्रमाणे :-
१.मुख्य प्रधान :- नीळकंठ मोरेश्वर हे या पदाचे काम पाहत होते.त्यामुळे राजकीय पत्रावर मुख्यप्रधान म्हणून त्यांच्या शिक्क्याची मोहोर उमटवली जात होती.
२.प्रतिनिधी :- बखरकार मल्हार रामराव लिहितात की हे पद शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी ते आपल्या युवराजला देणार होते परंतु काही कारणामुळे ते "अनामत" ठेवले गेले.
३.अमात्य :- महाराष्ट्रात या पदावर रामचंद्रपंत यांची नेमणूक करण्यात आली होती.
४.सचिव :- महाराजांच्या कारकीर्दीत या पदावर अण्णाजी दत्तो यांची नेमणूक करण्यात आली होती.
५.सेनापती :- या पदावर हंबीरराव मोहिते हे काम पाहत होते पुढे संताजी घोरपडे यांनी ह्या पदावर काम पाहिले.
६.सुमंत :- या पदावर महादजी गदाधर,शंकराजी मल्हार या विभूतींनी वेगवेगळ्या काळात या पदावर काम केले.
७.मंत्री :- या पदावर दत्तो मंगाची काम पाहत होते.परंतु राजाराम महाराज यांच्या काळात श्यामजीराव पिंडे यांनी या पदावर काम पाहिले.
८.पंडितराव :- महाराजांच्या काळात मोरेश्वर रघुनाथ हे या पदाचे काम पाहत होते.
या प्रमाणे शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ तयार केले होते या मध्ये आणखी एक ९ वे पद होते ते न्यायाधीशाचे होते.या पदावर निराजी रावजी, बाळाजी सोनदेव आणि राजाराम यांच्या कारकीर्दीत कान्हेर पंडित यांनी न्यायाधीश पदावर काम केले.वरीलप्रमाणे महाराजांच्या अष्टप्रधान मंडळ होते.
राज्यकारभार करताना स्वतःची व पदाची ओळख समजण्यासाठी/पटण्यासाठी सर्व कारभारी मंडळींना पत्रावर, पाकिटावर, सनदेवर आणि जहागिरी/वतनदारी चे पत्रावर मोहर/शिक्का उठवल्या जात होत्या.त्यासाठी हरेक व्यक्तीने पदानुसार नावाचा शिक्का तयार करून घेतला होता.त्यांची यादी खालील प्रमाणे.
मराठा साम्राज्याच्या थोर पुरुषांचे शिक्के मोहर
१.सन १६३९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोहर त्यावेळेला
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"
२.श्री संभाजी महाराजांची मोहोर
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।
३.श्री राजाराम महाराजांची मोहोर
धर्मप्रद्योतिताशेषवर्ण दशरथेऽरिव I
राजारामस्य मुद्रेयं विश्ववंद्या विराजते II
४.श्री शिवाजी महाराज दुसरे यांची मोहर
प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्व वंदिता I
रामसुनोरिय मुद्रा शिवराजअस्य राजतेII
5.छत्रपती शाहू यांची मोहर
श्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः। सा मूर्तिरिव वामनी ।
। शंभूसुतोरिव । मुद्रा शिवराजस्य राजते ।
६. श्री राजारामाची मोहोर
गौरी शंभू वर प्राय राज्य साम्राज्य संपदाI
शिवसुनोरियं मुद्रा रामराज्यस्य राजते
७. श्री प्रताप सिंह महाराजांची मोहोर
गौरीनाथ वर प्राप्ता शाहूराजात्मनात्मनःI
मुद्रा प्रतापसिंहस्य भद्रा सर्वत्र राजतेII
8.श्री छत्रपती करवीर संभाजी महाराजांची मोहोर
प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्व वंदिताI
शंभूछत्रपतैर्मुद्रा रामसुनो र्वीराजते II
9.धनाजी जाधवांचा शिक्का
राजाराम चरणी दृढ भाव I
सेनापती धनाजी जाधवराव II
१०.शामराव निळकंठ पेशवे यांची मुद्रा
श्री शिवनरपती हर्षनिधान I
शामराज मतीमंत प्रधान II
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुख्यप्रधान म्हणून मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांची नेमणूक केली होती. सन १६७२ मध्ये त्यांची नेमणूक झाली त्यानंतर सन १६७६ मध्ये त्रिंबक सूत मोरेश्वर हे मुख्य प्रधान म्हणून नेमले गेले.
क्रमशः
लेखक : नारायण आव्हाड
मोबाईल :९२७३८५८४५७
0 Comments