मूलभूत प्रश्नांपासून जनतेच्या विकासाची कामे मार्गी लावली


  मूलभूत प्रश्नांपासून जनतेच्या विकासाची कामे मार्गी लावली

 मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले : बाराबाभळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये विविध विकास कामाचा शुभारंभ माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न

नगर : तालुक्यातील बारा बाभळी हे गाव नगर शहराच्या जवळ असल्याने नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास येत आहे, त्यांना नागरी मुलभूत सुविधा देणे गरजेचे असून अनेक दिवसाचे प्रलंबित प्रश्न रस्ते, ड्रेनेज लाईन,  या सारख्या मूलभूत सुविधाची नागरिक प्रतीक्षा करत होते, बारा बाबळी येथे रस्त्याचा व बंदिस्त गटार पाईपलाईनचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता यासाठी राज्य सरकारकडून मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळाले आहे. नव्याने विकसित होणारा भाग म्हणून ओळखला जातो असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले


             बारा बाभळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये महेश नगर व  बेलेश्वर कॉलनी येथे बंदिस्त पाईपलाईन गटार व  रेणुका नगर, बारा वावळे हनुमान मंदिर रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल पानसरे, महेश झोडगे, सोनू भुजबळ, रावसाहेब वाघस्कर, माणिक वाघस्कर, सुभाष गुंजाळ, विनोद घोरपडे, दत्ता नाटक, भाऊ बेरड प्रकाश घोरपडे, आदित्य शिर्के, गोवर्धन मोरे,संतोष वाघस्कर, अरुणाताई कांबळे, सुरेंद्रसिंग घारू, अनिता बनसोडे, रोहिणी बनसोडे, मनीषा पालवे,जालिंदर फुंदे, किसन परदेशी,रामचंद्र वाभासे, बाबासाहेब वनवणे, संतोष वाघ,जयश्री शिरसाठ, मंगल घंगाळे, फरीदा चक्रनारायण, नंदा शिंदे, सुमित्रा सांगळे,कविता खेडकर, छाया शेलार, ज्ञानेश्वर फासे, अण्णा बनसोडे, नवनाथ पालवे,संदीप बनसोडे,कविता बडेकर , सुष्मा गर्जे आदि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

   रावसाहेब वाघस्कर म्हणाले की,  माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी नागरदेवळे बाराबाभळी, केकती, शहापूर, वडारवाडी या गावातील विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्याने गावाला गावपण मिळाले आहे, या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक  राहत असून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करत असतात, सकाळ पासून ते मध्यरात्री झोपेपर्यंत जनतेच्या सुख दुःखामध्ये सामील होण्याचे काम केले जात असून कर्डिले हेच जनतेला पर्याय आहे , येत्या विधानसभेत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे मत नागरिकांनी व्यक्त करत आहे असे त्यांनी सांगितले . 

Post a Comment

0 Comments