सावेडी ते बोल्हेगांव येथील पुलाचे काम लवकर मार्गी लावा

सावेडी ते बोल्हेगांव येथील पुलाचे काम लवकर मार्गी लावा : सभापती कुमारसिंह वाकळे

वेब टीम अहमदनगर : सावेडी गांवठाण पासून ते बोल्हेगांव गावठाण कड़े जाणा-या सिनानदीवरील पुलाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यामध्ये सीना नदीला येणाऱ्या पुरामुळे हा रस्ता पाण्याखाली जाऊन तासंतास बंद राहतो यामुळे आधीच कमकुवत असलेला पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे तसेच या रस्त्यावर मोठया प्रमाणात नविन वसाहती निर्माण झाल्या आहेत.निंबळक व बोल्हेगांव या परिसरातील शेतकरी, बिल्डर, काही प्रमाणात कंपन्यांचे अवजड वाहनांची या पुलावरून वाहतूक चालू असते. तसेच नविन नागरी वस्त्या झाल्या मुळे शाळा कॉलेजचे विद्यार्थी, कामगार वर्ग, वयोवृद्ध नागरीकांची या पुलावरून रात्रंदिवस वाहतुक सुरू असते. सदपरिस्थीतीमध्ये या पुलाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. पुलावरील सिमेंट काँक्रीट पुर्णपणे उखडले आहे. त्यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात  खड्डे पडलेले असून. स्टील उघडे पडले आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे नाहीत.मोठ्या प्रमाणात पाउस झालेला असल्याने नदीमधुन पाण्याचा प्रवाह मोठया प्रमाणात सुरू आहे. हा पूल नागरीकांसाठी अत्यंत धोकादायक झालेला आहे.या ठिकाणी नविन पुल करणे अत्यावश्यक झाले आहे. नविन पुल होईपर्यंत सध्याच्या परिस्थितीत पुलाचे दुरुस्तीचे काम होणे अत्यंत गरजेचे आहे तरी महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर दुरूस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे आशयाचे निवेदन मनपा उपायुक्त श्रीनिवास कुरे यांना दिले यावेळी अक्षय वाटमोडे, अभिषेक वाकळे,रोहित वाकळे, प्रतीक वाकळे दत्ता रकटे, दीपक राजापुरे,शंकर वाटमोडे, आदित्य खरात, कान्हा मेने,प्रसाद वाटमोडे,अविनाश वाटमोडे,वैभव वाटमोडे आदी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments