"आदर्श संगीत शिक्षक" पुरस्काराने सन्मानित व्यक्तींचा सत्कार "


"आदर्श संगीत शिक्षक" पुरस्काराने सन्मानित व्यक्तींचा सत्कार "


वेब टीम अहमदनगर :नगरमधिल जेष्ठ संगीतज्ञ आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संस्कृत पंडित महामहोपाध्याय प्रा.डाॅ.देवीप्रसाद खरवंडीकर सरांना अखिल भारतीय स्तरावरील "आदर्श संगीत शिक्षक" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा रविवार दि.१८ डिसेंबर रोजी संध्याकाळी माऊली सभागृहात संपन्न होणार आहे. 

     अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या वतीने कै.मनोरमा अच्युत परांजपे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या वर्षाचा हा पुरस्कार प्रा.डाॅ. देवीप्रसाद खरवंडीकर यांना घोषित करण्यात आलेला आहे.

     या निमित्ताने अ.भा.गां. महाविद्यालय मंडळ आणि सरगमप्रेमी मित्र मंडळ नगर यांच्या संयुक्त विद्यमाने "सन्मान गुरुशिष्य परंपरेचा" या अंतर्गत संगीत सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संगीत सभेमध्ये सुप्रसिद्ध गायिका पंडिता सुश्री.शुभदा पराडकर मॅडम आणि त्यांच्या शिष्या सौ.मानसी कुलकर्णी देशपांडे यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन रसिकांना ऐकायला मिळणार आहे. त्यांना संवादिनी संगत श्री.मकरंद खरवंडीकर आणि तबला साथ श्री.धनंजय खरवंडीकर या बंधूद्वयांची असेल. हे दोघेही बंधू डाॅ.देवीप्रसाद खरवंडीकर यांचे चिरंजीव आणि शिष्य आहेत.

     हा सन्मान सोहळा अ.भां.गां. महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष डाॅ.विकास कशाळकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. मंडळाचे रजिस्ट्रार श्री.विश्वास जाधव, उपाध्यक्ष पं.पांडुरंग मुखडे, सचिव श्री.बाळासाहेब सूर्यवंशी, कोषाध्यक्ष डॉ.किशोर देशमुख, अन्य सर्व संचालक, संगीत शिक्षक परिषदेचे संयोजक श्री.रामराव नायक आणि संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्र विहान इव्हेंटस् च्या सौ.भावना बोरा सांभाळणार आहेत. रसिकांनी या संगीत सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन सरगमप्रेमी मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.धनेश बोगावत यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments