ढोलताशाच्या निनादात समृद्धीचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

 ढोलताशाच्या निनादात समृद्धीचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रा्ज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

नागपूर: ढोल ताशाचा निनादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नागपूरमध्ये नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या शिर्डीपर्यंतच्या ५२० किलोमीटर टप्प्याचे लोकार्पण झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रा्ज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

कार्यक्रमाला राज्यपाल भगतिसंह कौश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. खापरी येथे मेट्रो मार्गिकेच्या उद्गाटनाचा कार्यक्रम आटोपून पंतप्रधान समृद्धीच्या वायफळ टोल नाक्याजवळ असलेल्या कार्यक्रम स्थळीआले. तेथे त्यांच्या स्वागतासाठी ढोल ताशाचे पथक तैनात करण्यात आले होते.

उद्घाटनाच्या वेळी मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्यानंतर त्यांनी ढोलताशा पथकाचाही आनंद घेतला. थोडा वेळ त्यांनीा ढोलही वाजवला.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये ७०१ किलोमीटरच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते. आता ते मुख्यमंत्री आहेत व फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत.

Post a Comment

0 Comments