"नगर टुडे" परिवाराच्या
वतीने सर्वांना
"विजयादशमीच्या" हार्दिक शुभेच्छा
|| जागर शक्तीचा || जागर नवदुर्गांचा ||
सिद्धीदात्री
ब्रह्मांड उत्पत्तीच्या वेळी रुद्रदेवाने आदिपराशक्तीची उपासना केली. असे म्हणतात कि पराशक्ती तेव्हा ऊर्जा रूपात होती. तेव्हा हि शक्तीची परम देवता आदिपराशक्ती महादेवाच्या शरीराच्या डाव्या भागातून देवी सिद्धीदात्रीच्या रूपात प्रकट झाली.
पूजन :
देवी सिद्धीदात्रीचे पूजन नवरात्रीच्या नवव्या दिवशी केले जाते.
अधिपत्यातील ग्रह:
असे म्हणतात कि देवी सिध्दिदात्री हि केतू ग्रहाला शक्ती प्रदान करते आणि त्याचे मार्गदर्शन करते. म्हणूनच केतू ग्रहावर तिची सत्ता आहे.
देवीचे वर्णन:
देवी सिध्दिदात्री कमलपुष्पावर आसनस्थ होते व सिंहावर बसून भ्रमण करते, तिला चार हात असून तिने एका उजव्या हातात गदा तर दुसऱ्या उजव्या हातात चक्र धरले आहे आणि एका डाव्या हातात कमळ तर दुसऱ्या डाव्या हातात शंख धारण केला आहे.
देवी सिध्दिदात्री हि अशी देवी आहे जिला सव्र्ह सिद्धी प्राप्त असून ती भक्तांसाठी सिध्दिदायिनी ठरते. भगवान महादेवालाही सिध्दिदात्रीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. फक्त मानवच सिध्दिदात्रीची पूजा करत नाही तर देव , गंधर्व, असुर,यक्ष, आणि सिद्ध देखील तिचे पूजन करतात. महादेवाच्या वामांगातून निर्मिती झाल्यामुळे शंकराला अर्धनारेश्वर असे नाव मिळाले.
कालरात्री आणि महागौरी प्रमाणे देवी सिध्दिदात्रीलाही रातराणीची फुले प्रिय आहेत.
मंत्र : ॐ देवी सिद्धिदात्र्यै नमः॥
प्रार्थना :
सिद्ध गन्धर्व यक्षाद्यैरसुरैरमरैरपि।
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी॥
स्तुती :
या देवी सर्वभूतेषु माँ सिद्धिदात्री रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
देवी ध्यानम:
वन्दे वाञ्छित मनोरथार्थ चन्द्रार्धकृतशेखराम्।
कमलस्थिताम् चतुर्भुजा सिद्धीदात्री यशस्विनीम्॥
स्वर्णवर्णा निर्वाणचक्र स्थिताम् नवम् दुर्गा त्रिनेत्राम्।
शङ्ख, चक्र, गदा, पद्मधरां सिद्धीदात्री भजेम्॥
पटाम्बर परिधानां मृदुहास्या नानालङ्कार भूषिताम्।
मञ्जीर, हार, केयूर, किङ्किणि रत्नकुण्डल मण्डिताम्॥
प्रफुल्ल वन्दना पल्लवाधरां कान्त कपोला पीन पयोधराम्।
कमनीयां लावण्यां श्रीणकटिं निम्ननाभि नितम्बनीम्॥
स्तोत्र :
कञ्चनाभा शङ्खचक्रगदापद्मधरा मुकुटोज्वलो।
स्मेरमुखी शिवपत्नी सिद्धिदात्री नमोऽस्तुते॥
पटाम्बर परिधानां नानालङ्कार भूषिताम्।
नलिस्थिताम् नलनार्क्षी सिद्धीदात्री नमोऽस्तुते॥
परमानन्दमयी देवी परब्रह्म परमात्मा।
परमशक्ति, परमभक्ति, सिद्धिदात्री नमोऽस्तुते॥
विश्वकर्ती, विश्वभर्ती, विश्वहर्ती, विश्वप्रीता।
विश्व वार्चिता, विश्वातीता सिद्धिदात्री नमोऽस्तुते॥
भुक्तिमुक्तिकारिणी भक्तकष्टनिवारिणी।
भवसागर तारिणी सिद्धिदात्री नमोऽस्तुते॥
धर्मार्थकाम प्रदायिनी महामोह विनाशिनीं।
मोक्षदायिनी सिद्धीदायिनी सिद्धिदात्री नमोऽस्तुते॥
देवी कवच :
ॐकारः पातु शीर्षो माँ, ऐं बीजम् माँ हृदयो।
हीं बीजम् सदापातु नभो गृहो च पादयो॥
ललाट कर्णो श्रीं बीजम् पातु क्लीं बीजम् माँ नेत्रम् घ्राणो।
कपोल चिबुको हसौ पातु जगत्प्रसूत्यै माँ सर्ववदनो॥
0 Comments