कोळगाव दलित अत्याचार आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हे दाखल
वेब टीम श्रीगोंदा : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगांव येथे दि.५ जुलै २०२२ रोजी झालेल्या मागासवर्गीय तरुणाच्या अर्धनग्न धिंड व जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी यातील कायदा हातात घेणाऱ्या आरोपीं विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की,दि.५ जुलै २०२२ रोजी चर्मकार मागासवर्गीय समाजाच्या एका तरुणाला जमावाने पकडून त्याचे मुंडण करून जातिवाचक शिवीगाळ करत,अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली होती.
या प्रकरणी व्हिडिओ क्लिप च्या आधारे दि.११ जुलै २०२२ रोजी दोन समाजात शत्रुत्व वाढवण्याच्या दृष्टीने व समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असंविधानिक जमाव जमवून जातीवाचक बोलणे या कलमान्वये नमूद आरोपींवर पोलीसांनी फिर्यादी होत गुन्हे दाखल केले होते.दि.१३ जुलै २०२२ रोजी पीडिताच्या वडीलांचे व भावाचे पोलिसांनी जबाब नोंदविले त्यांनी दिलेल्या जबाबानुसार ॲट्रॉसिटीचे वाढीव कलम नोंद करण्यात आले.त्यामध्ये अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात ॲट्रॉसिटीच्या 3(1)(R)(S), 3(D), 3(I) व 3(2)(va) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप मध्ये दिसणारांपैकी समोरील ४ जणांसह घटनास्थळी उपस्थित असलेल्या अतिरिक्त ३ व इतर १५ ते २० लोकांवर नमूद गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय चाटे करीत आहेत,व्हायरल व्हिडिओ क्लिपच्या आधारे आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
0 Comments