ऑपरेशन "मुस्कान " द्वारे २३८३ हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात यश

ऑपरेशन "मुस्कान" द्वारे २३८३ हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात यश 

वेब टीम नगर : दि.१जून  ते ३०जून  दरम्यान ऑपरेशन मुस्कान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवणे बाबत तसेच महिला व बालके यांचा शोध घेण्याचे आदेश झाले होते.त्या अनुषंगाने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये हरविलेल्या महिला-पुरुष तसेच अपनयन व अपहरण केलेले बालके यांचा शोध कामी विशेष मोहीम राबविण्यात आली होती.ऑपरेशन मुस्कान दरम्यान अहमदनगर रेकॉर्डवरील १८९ लहान मुलांचे अपहरणाचे गुन्हे दाखल असून त्यापैकी एकूण ५९ गुन्ह्यातील ६१ बालके त्यापैकी ५३ मुली व ८ मुले यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात आला आहे.

 एकूण १९७१ व्यक्ती हरवलेल्या होत्या त्यापैकी ५०७ व्यक्तींचा शोध घेतलेला आहे.१०८६ महिलांपैकी २९८ महिला व ८८५ पुरूषांपैकी २०९ पुरुष यांचा शोध घेण्यात आलेला आहे. तसेच पालकांसोबत गेलेले एकूण पेंडींग मुले-मुली १५४ पैकी एकूण ३४ त्यापैकी १५ मुली व १९ मुले यांचा शोध घेण्यात येऊन त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.तसेच नगर शहर व अहमदनगर जिल्ह्यात शोध घेता बाहेर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील २ सज्ञान पुरुष मिळून आले असून त्यांना संबंधित पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आलेले आहे. 

 रेकॉर्ड व्यतिरिक्त २० बालके त्यापैकी ९ मुली व ११  मुले मिळून आलेले आहेत व ते नातेवाईकांच्या ताब्यात दिलेले आहेत.ऑपरेशन मुस्कान ११ दरम्यान एकूण ६२० मुले, मुली,स्त्री,पुरुष यांचा यशस्वीरित्या शोध घेण्यात आला आहे.सदरची यशस्वी कामगिरी श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्री.सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग,श्री. कमलाकर जाधव पोलीस उपअधीक्षक अहमदनगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक भीमराव नंदुरकर व पोसई भैय्यासाहेब देशमुख,मपोहेकॉ. अर्चना काळे,मपोहेकॉ. अनिता पवार,मपोकॉ. छाया रांधवन,मपोकॉ. रूपाली लोहाळे,चापोकॉ.एस.एस.काळे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments