गावठीकट्टा बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून गजाआड

गावठीकट्टा बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून गजाआड 

वेब टीम नगर : गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद,सोन्या उर्फ संतोष पांडुरंग बंगाळ असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.प्रस्तुत बातमीतील हकिकत अशी की मा.पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्या बाबत सूचना केल्याने मा.पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील यांनी पोलिस निरीक्षक अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील गावठी कट्टे बाळगणाऱ्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.

 पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांना आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे अधिकारी व अंमलदार हे अहमदनगर जिल्ह्यातील अवैधरित्या गावठी कट्टे अग्निशस्त्र बाळगणार्‍याची माहिती घेत असताना दि.४/६/२०२२ रोजी अनिल कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गोपनीय माहिती मिळाली की प्रवरासंगम बस स्टॅन्ड तालुका नेवासा येथे एक मध्यम बांध्याचा मुलगा देशी बनावटीचा कट्टा अग्निशस्त्र व काडतूस विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकातील सपोनि. गणेश इंगळे,पोहेकॉ.  दत्तात्रय गव्हाणे, मनोज गोसावी,पोना. ज्ञानेश्वर शिंदे,पोना.  शंकर चौधरी,पोना. दिपक शिंदे,पोकॉ. शिवाजी ढाकणे व चापोहेकॉ.  संभाजी कोतकर यांना बातमीतील हकीकत कळवून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून  कारवाई करणे बाबत तोंडी सूचना दिल्या. 

त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी प्रवरासंगम येथे सापळा लावून थांबले असताना वरील नमूद बातमीतील वर्णनाचा एक इसम बस स्टॉप परिसरात फिरत असताना दिसला नमूद बातमीतील इसम हाच असल्याची खात्री होतात त्यास घेराव घालून ताब्यात घेऊन त्यास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आपली ओळख करून देऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सोन्या उर्फ संतोष पांडुरंग बंगाळ वय २९ वर्ष रा.रोटेगाव ता.वैजापूर,जि.औरंगाबाद, असे सांगितले त्याची पंचां समक्ष झडती घेतली असता त्याच्या कब्जामध्ये ३०,००० रू किमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व ४०० रू किमतीचे २  जिवंत काडतुसे असा ३०,४०० रू किमतीचा मुद्देमाल मिळून आला.ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुद्ध पोना. 

१८५ ज्ञानेश्वर शिंदे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन फिर्याद दिली असून त्याबाबत नेवासा पोलीस स्टेशनला गु.र.नं.४५९/२०२२ भारतीय हत्यार कायदा कलम३/२५/७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई श्री.बि.जी. शेखर पाटील पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या आदेशाने मा.श्री. मनोज पाटील पोलीस अधिक्षक अहमदनगर,मा. श्रीमती स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,मा.श्री. सुदर्शन मुंडे उपविभागीय पोलिस अधिकारी शेवगाव विभाग अहमदनगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. पुढील कारवाई नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.

Post a Comment

0 Comments