अवैध गॅस रिफिलींग करणारा आरोपी अटकेत

अवैध गॅस रिफिलींग करणारा आरोपी अटकेत 

वेब टीम नगर : पारनेर तालुक्यात घरगुती गॅस टाकीमधील गॅस अवैधरित्या छोट्या गॅस टाकीमध्ये निष्काळजीपणे रिफीलिंग करणा-या आरोपीस ८० हजार ८९० रु. किंमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/ अनिल कटके यांना आदेश दिले होते. सदरील आदेशान्वये पोनि श्री. अनिल कटके यांनी स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणूक करुन फरार पाहिजे आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या. 

 पथकातील सपोनि दिनकर मुंढे,सफौ भाऊसाहेब काळे,पोहेकॉ विजय वेठेकर,दत्ता हिंगडे,पोना शंकर चौधरी,राहुल सोळंके,पोकाॅ मथुर गायकवाड,सागर ससाणे असे पारनेर परिसरात पेट्रोलिंग फिरुन फरार पाहिजे आरोपींचा शोध घेत होते.यावेळी पोनि श्री.कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,श्री.अरुण वरखडे(रा. वरखडे वस्ती ता. पारनेर) हा ज्वलनशिल पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता धोकादायक पध्दतीने घरगुती गॅसचे टाकीतून छोट्या गॅस टाकीमध्ये गॅस रिफीलिंग करुन गॅसची चोरी करत आहे, आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोनि श्री.कटके यांनी सदरील माहिती पथकास कळविली व खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या.

मिळालेल्या माहितीनुसार पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरखडेवस्ती, (ता. पारनेर) येथे जाऊन पाहणी केली.एकजण त्याच्या राहते घराचे आडोश्याला एका घरगुती गॅस टाकीमधून एका छोट्या गॅस टाकीमध्ये गॅस भरत असताना दिसून आला पोलीस व पंचाची खात्री होताच छापा टाकून त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अरुण पोपट वरखडे (वय ३६) असे सांगितले. 

त्याच्याकडे गॅस भरणे अगर विक्री करणे बाबत परवाना आहे का ? अशी विचारणा करता सदर इसमाने अधिकृत परवाना नसले बाबत माहिती दिल्याने त्यास भारत, एचपी, इण्डेन गॅस कंपनीच्या ३९ गॅसटाक्या, एक इलेक्ट्रिक मोटर व एक वजन काटा असा एकूण ८० हजार ८९० रु. किंचे मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेऊन पारनेर पोलीस ठाण्यात ४१३/२०२२ भादविक ३७९, २८५ सह जिवनावश्यक वस्तु कायदा कलम ३, ७ सह एल.पी.जी. पुरवठा आणि वितरण नियमन कलम ३, ४, ५, ६ व ७ प्रमाणे पोकाॅ मयुर दिपक गायकवाड ने. स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी फिर्याद दिली आहे. पुढील कारवाई पारनेर पोलीस ठाणे करीत आहे.

Post a Comment

0 Comments