दर्जेदार शिक्षण देऊन जबाबदार नागरिक घडविणारं 'पोदार इंटरनॅशनल स्कूल'
कोविड महामारीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी मे महिन्यात ब्रिज कोर्स व फॉउंडेशन कोर्स सुरु करणारी एकमेव पोदार शाळा
वेब टीम नगर : केडगाव येथे असलेली पोदार इंटरनॅशनल स्कूल (सी. बी. एस. ई.) मुलांना २१ व्या शतकातील गरज ओळखून सर्वगुण संपन्न व जबाबदार नागरिक बनविण्यासाठी लागणारे शिक्षण देत आहे. गेल्या २ वर्षात कोविड मुळे सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्यावे लागले, नगर शहरामध्ये पोदार एकमेव शाळा होती कि जिने लॉकडाऊन घोषित झाल्याबरोबर लगेचच ऑनलाईन शिक्षणावर संशोधन करून अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे १ एप्रिल २०२१ पासूनच ऑनलाईन वर्ग सुरु केले होते. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी शाळेने घेतली व सर्व शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून दिले.
परीक्षा, रिपोर्ट कार्ड, पालकसभा, लिखाण तपासणी, इतर सहशालेय उपक्रम सर्व काही अगदी सुरळीतपणे उपलब्ध करून दिल्याने . पालक समाधानी राहिले व विद्यार्थ्यांचे नुकसान झाले नाही.त्याबद्दल सर्व पालकांनी शाळेचे व शिक्षकांचे आभार मानून कौतुक केले. नवनवीन ऍप चा शोध लावून नवनवीन पद्धती वापरून शिक्षण देण्याचे अविरत काम शाळेने केले.
जशी शाळा ऑफलाईन सुरु झाली तसे ज्या मुलांनी नवीन प्रवेश घेतला त्यांच्यासाठी ब्रिज कोर्स म्हणून एक नवीन उपक्रम सुरू केला जेणे करून ऑनलाईन मुळे जर त्यांना मागच्या वर्गात काही समजले नसेल तर ते पुन्हा विद्यार्थ्यांना शिकवून मग पुढच्या वर्गातील धडे शिकवता येतील. तसेच सगळीकडे उन्हाळी सुट्टी असताना व शिक्षक सुद्धा घरी असले तरी पोदार शाळेतील शिक्षकांनी शिकवण्याचे काम मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीतही सोडले नाही. आणि इयत्ता पहिली ते आठवी मधील विद्यार्थ्यांना त्यांचा इंग्रजी व गणित या विषयाचा पाया मजबूत होण्यासाठी फॉउंडेशन कोर्सचा उपक्रम उन्हाळी सुट्टीत राबवला. इयत्ता नववी व दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वर्ग घेऊन शिक्षक त्यांची तयारी करून घेत होते . नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी शाळा व सर्व शिक्षक हे अगदी जीव ओतून मेहनत करत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये एक उत्तम शाळा निवडल्याबद्दलचे समाधान पाहायला मिळते .
संस्थेचे पहिले अध्यक्ष महात्मा गांधीजी होते, त्यांच्या तत्वावर पोदार शिक्षण समुह १९२७ पासून कार्यरत आहे. आज ९४ वर्षाच्या शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर पोदार शिक्षण संस्थेच्या १३६ च्या वर शाळा संपूर्ण भारतात असून एक लाख ८० हजारा पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पोदार शाळा आधुनिक शिक्षणाबरोबर पारंपरिक मूल्य जपण्याचे सुद्धा कार्य करते .
मुलांच्या बौद्धिक विकासासाठी शाळेमध्ये सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, गणित , इंग्रजी , आर्ट अँड क्राफ्ट , संगीत लॅब, साइबर साइन्स अशा सुविधा आहेत. शाळेत तंत्रज्ञान वापरुन शिक्षण दिले जाते. प्रत्येक वर्गामध्ये प्रोजेक्टर व संगणक वापरुन शिक्षक अध्यापन करतात. पुस्तकाचे ओझे कमी करण्यासाठी ई-बुक्स सारखी संकल्पना सुद्धा शाळेत सुरू केलेली आहे. प्राथमिक पातळीवर इंग्रजी भाषा विकसित होण्यासाठी इंग्लीश सिम्फॉनिक्स नावाचा एक नवा विषय शाळेने अन्य देशातील शिक्षण पद्धतीचे संशोधन करून सुरू केला आहे. संस्थेचा स्वतःचा एक अभ्यासक्रम संशोधन केन्द्र आहे, त्यामार्फत नवनवीन संकल्पना शाळेत राबविल्या जातात. त्यामुळे पोदारच्या शाळेमध्ये दर्जा कायम ठेवून शिकविण्याची पद्धत ही एकच असते. मुलांना एका शहरातून दुसऱ्या शहरात ट्रान्स्फर घेताना त्यामुळे काही त्रास होत नाही. ओलिमपियाड, टॅलेण्ट सर्च व शिष्यवृत्ती सारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षेची येथे तयारी करून घेतली जाते.
पूर्व प्राथमिक वर्गामध्ये ब्रिटीश ई. वाय. एफ. एस. अभ्यासक्रम राबविला जातो. जो भारतात इतर कोणत्याही पूर्व प्राथमिक शाळेत शिकविला जात नाही. मुलांच्या बौद्धिक विकासात सुरुवातीची ६ वर्ष खूप महत्वाची असतात त्यामुळे संपूर्ण बालमानसशास्त्रावर आधारित शिक्षण येथे दिले जाते. पोदार जम्बो किड्सला एजुकेशन वर्ल्ड मॅगेझीन मार्फत विविध राज्यात ३० अवॉर्ड तसेच सर्वोत्कृष्ठ पूर्व प्राथमिक शिक्षण देणारी संस्था असा सन्मान मिळालेला आहे. पोदार शिक्षण संस्थेला शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करणारी सर्वोत्कृष्ठ संस्था असा सन्मान आशियातील ग्लोबल सर्व्हिसेस संस्थेच्या मार्फत देण्यात आला.
या संस्थेतील सर्व शिक्षक हे प्रशिक्षित व अनुभवी असून त्यांना वेळोवेळी व्यावसायिक व व्यावहारिक प्रशिक्षण संस्थेकडून दिले जाते त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्व शिक्षण देण्यात शाळा यशस्वी होते. मुलांकडून तयारी करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी शाळेने घेतली असून अतिरिक्त व उपचारात्मक वर्ग हे मोफत शाळेत दिले जातात. मुलांच्या सुरक्षीततेला प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळे संपूर्ण शाळेचा परिसर सीसीटीवी कॅमेराच्या देखरेखीखाली आहे. तसेच शाळेच्या बसमध्ये सुद्धा सीसीटीवी कॅमेरा बसविले असून २ महिला सेवक बसमध्ये उपलब्ध असतात, आरटीओ च्या नियमांचे तंतोतंत पालन करत शाळा अहमदनगर शहरामध्ये वाहतुक सुविधा पुरवत आहे.
शाळेचे ध्येय हे विद्यार्थी केंद्रित शिक्षण देणे असून एक व्यापक स्वरुपात अभ्यासक्रम स्वीकारून प्रत्येक विद्यार्थ्याला एक स्वतंत्र, जबाबदार व देशाची सेवा करणारा नागरिक घडवण्याचे कार्य आम्हाला करायचे आहे असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन पोदार यांचे ध्येय आहे. त्याचप्रमाणे नव्या पिढीला भविष्याचे सगळे दरवाजे उघडे करून उंच आकाशात भरारी घेण्याची प्रेरणा देण्याचे तसेच आताच्या पिढीला आधुनिक साधनाच्या माध्यमातून जागतिक पातळीवरील शिक्षण देण्याचे उद्दिष्ट असल्याचा शाळेचे संचालक श्री. गौरव पोदार यांचा मानस आहे . प्रत्येक विद्यार्थ्याला एक दर्जात्मक शिक्षण मिळण्यासाठी शाळा माफक फी आकारून कोणत्याही प्रकारचे डोनेशन व डिपॉजिट घेत नाही, मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी अतिरिक्त छंदाचे व खेळांचे प्रशिक्षण मोफत दिले जाते व जागतिक दर्जाच्या प्रत्येक सुविधा शाळेत पुरवून मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक शिक्षण देण्यासाठी आम्ही झटत आहोत असे संचालक श्री. हर्ष पोदार यांनी सांगितले.
पालक व शाळा संवाद हा मुलांच्या विकासासाठी खूप महत्वाचा असतो, त्यामुळे पालकांचे अभिप्राय शाळा सातत्याने घेत असते, वेळोवेळी पालकांशी संवाद साधण्यासाठी शाळेने मोबाईल अप्लिकेशन बनवलेले आहे. ज्यामधून पालक शिक्षकांना संदेश पाठवू शकतात, हजेरी बघू शकतात, शाळेत काय शिकविले जाते तसेच गृहपाठ काय दिला आहे हे सुद्धा घर बसल्या बघू शकतात. केवळ पुस्तकी ज्ञान न देता अनुभवात्मक शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न नेहमीच असतो, विविध नवनवीन उपक्रम राबवून मुलांना शिक्षण येथे दिले जाते, ज्यामुळे विद्यार्थी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन यश संपादन करू शकतो, आम्ही असे शिक्षण देण्याचा सतत प्रयत्न करतो की ज्यामुळे मुलांच्या बौद्धिक व मानसिक विकासाबरोबर व्यक्तिमत्व विकास सुद्धा होईल व प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आपल्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण होईल आणि एक चांगली पिढी तयार होईल असे पोदार इंटरनॅशनल स्कूल अहमदनगर चे प्राचार्य श्री. मंगेश जगताप यांनी सांगितले.
0 Comments