महिलेचा कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

महिलेचा कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न 

वेब टीम नगर : पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा राग मनात धरून एका महिलेने कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

सदरील महिला ही माळीवाडा अहमदनगर येथे रहात असुन रविवारी दि.२६/०६/२०२२ रोजी दुपारी ही घटना घडली असुन सदरील महिलेवर उपचार सुरु आहेत.याप्रकरणी संबंधित महिले विरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याप्रकरणी महिला पोलीस नाईक वंदना काळे यांनी फिर्याद दिली आहे. 

Post a Comment

0 Comments