अग्नीपथ,अग्नीवीर या भ्रामक योजनेविरोधात विविध पुरोगामी पक्ष संघटनांची निदर्शने !

अग्नीपथ,अग्नीवीर या भ्रामक योजनेविरोधात विविध पुरोगामी पक्ष संघटनांची निदर्शने !

वेब टीम नगर : येथील पत्रकार चौकातील भगतसिंह स्मारक येथे एआयवायएफ, एसएफ, सिटू, आप यांच्यासह शहरातील पुरोगामी पक्ष संघटनांच्यावतीने आज दि. १८ रोजी निदर्शने करण्यात आली. आंदोलकांच्या वतीने आप'चे दिलीप घुले आणि क्रांतिसिंह'चे काम्रेड बाळासाहेब सागडे यांच्या हस्ते शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी "सेव्ह युथ, सेव्ह इंडिया", "इन्कलाब जिंदाबाद", "शहीद भगतसिंह को लाल सलाम" या घोषणा दिल्या.

आंदोलकांनी भगतसिंह स्मारकासमोर युवकविरोधी असलेल्या अग्नीवीर व अग्नीपथ योजनेच जाहीर धिक्कार केला. यावेळी विविध वक्त्यांची भाषणे झाली.

दिलीप घुले यांनी हे देशातील बहुजन तरूणाईविरोधी षडयंत्र असल्याचे सांगितले तसेच या षडयंत्रविरोधात आम आदम3 पक्ष युवकांसोबत असल्याचे सुतोवाच केले.

ऑल इंडिया युथ फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष कॉ. फिरोज शेख यांनी बेरोजगार तरूणाईची केंद्र सरकार मोठी दिशाभुल करत असल्याचे सांगितले तसेच येत्या काळात जर सरकारने हि योजना मागे घेतली नाही तर शेतकरी आंदोलनासारखे युवक आंदोलन देशभर उभे राहिल, असे सांगितले.

ऑल इंडिया युथ फेडरेशनचे जिल्हा सचिव कॉम्रेड कार्तिक पासलकर यांनी सांगितले कि देशातील कामगार कायदे संपविण्याचे षडयंत्र हे सरकार करत आहे. त्याची ट्रायल म्हणून या योजना सरकारने पुढे आणल्याचे दिसत आहे. या योजनेआडून कामगार कायद्यांवर घाला घालायचे काम सुरू आहे.

सिटू'चे कॉम्रेड महादेव पालवे हे म्हणाले कि, केंद्रातील सरकार बहुजनविरोधी असल्याचे वेळोवेळी सिध्द झाले आहे. हि योजना बहुजन तरूणांचे भविष्य धोक्यात आणत आहे. चार वर्षानंतर 'ना पेन्शन, ना वेतन" अशा पेचात टाकून तरूणांची सामाजिक सुरक्षा धोक्यात आणत आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. भैरवनाथ वाकळे म्हणाले कि, मोदी सरकारचे हे भांडवलदारी षडयंत्र भारतीय समाजाचे लष्करीकरण करण्याचा डाव दिसत आहे. चार वर्षानंतर या मुलांना ना नोकरी, ना रोजगार मिळणार, ना सामाजिक सुरक्षा व सन्मान मिळणार. या बेरोजगारी संकटामुळे देशात नवी अराजकता येण्याचा धोका आहे. दोन कोटी रोजगाराचा प्रश्न टाळण्यासाठी दहा लाख नोकऱ्या चे अमिष दाखविले आहे. त्या अमिषाचाच एक भाग हि योजना दिसत आहे. या भ्रामक योजनेमुळे बहुजन समाजात अस्वस्थता निर्माण झालेली आहे कारण व्यापाऱ्यांची मुले रिक्रुट भरती होत नाहीत तर बहुजनांची होतात. त्यांचे भविष्य धोक्यात आणण्याचा हा 'बनिया डाव' मोदी सरकारने टाकलेला दिसत आहे.

आर्किटेक्ट अर्शद शेख यांनी आंदोलकांना सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी विविध पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले. "इन्कलाब जिंदाबाद", " अग्नीपथ, अग्नीवीर योजना रद्द करा!", "भारतीय लष्कराचे ठेकेदारीकरण रद्द करा !" या घोषणा यावेळी देण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन प्रधानमंत्री व गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणार आहे.

या आंदोलनात अरूण थिटे, दत्ताभाऊ वडवणीकर, संतोष गायकवाड, विजय केदारे, दिपक शिरसाठ, तुषार सोनवणे, राजेंद्र कर्डिले, भरत खाकाळ, अमोल चेमटे, सतीश निमसे, वैभव कदम, अमोल पळसकर, दत्ता जाधव, आकाश साठे, रावसाहेब कर्पे, महादेव भोसले, राजु नन्नवरे, आसाराम भगत, कुशिनाथ कुळधरण, लहूजी लोणकर, चंद्रकांत माळी, अशोक बर्डे, गणेश माळी, जावेद शेख, सागर साळवे, कुंडलिक जाधव, विक्रम क्षिरसागर, नाना खरात, सुरेश आदमाने यांच्यासह आम आदमी पक्ष, सिटू, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया युथ फेडरेशन, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, कामगार संघटना महासंघाचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते.(फोटो-अग्निपथ)

Post a Comment

0 Comments