गावठी कट्टे विकणारी टोळी जेरबंद

गावठी कट्टे विकणारी टोळी जेरबंद 

वेब टीम श्रीरामपूर : राज्यात सध्या अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाबत विशेष मोहिमेचे आयोजन करुन कारवाई करण्याबाबत पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांनी आदेश दिले होते.

त्या नुसार नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक . बी. जी. शेखर पाटील ,जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि. सोमनाथ दिवटे, सफी. राजेंद्र वाघ, सफो.  संजय खंडागळे, पोहेकॉ . बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना. भिमराज खर्से, शंकर चौधरी, सुरेश माळी, रवि सोनटक्के, पोकॉ. मयुर गायकवाड, सागर ससाणे व चापोहेकॉ. चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहिती नुसार श्रीरामपूर शहरात दाढी वाढलेले तीन इसम हे गावठी कट्टे व जिवंत काडतूसे विक्री करण्यासाठी हॉटेल राधिकाचे पार्किंग जवळ येणार आहेत.
त्या नुसार पोलिसांनी सापळा रचून हॉटेल राधिकाच्या गाड्यांच्या पार्किंग कडे दाढी वाढलेले तीन इसम आजुबाजूला संशयीतरित्या टेहळणी करत  येतांना दिसले.पोलिसांनी त्या तिघांना घेरून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांची चाहूल लागताच ते संशयित लोक पळून जाऊ लागले मात्र पोलीस पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कडे आठ (०८) गावठी बनावटी कट्टे, दहा (१०) जिवंत काडतूसे व सॅक असे एकूण २,४५,१००/- रु.किं.चा मुद्देमाल मिळून आला.


या गावठी कट्टे विकण्यास येणाऱ्या इसमंची नावे राहुलसिंग फत्तुसिंग कलानी वय – २५, आकाशसिंग बादलसिंग जुनी, वय – २२, अक्षयसिंग तिलकसिंग कलानी वय – २२ सर्व रा. श्रीरामपुर बाजारतळ, गुरुगोविंदसिंग नगर, वॉर्ड नं. ३, ता. श्रीरामपुर असे असून पोलीस आता या आरोपींकडून पुढील तपास करणार आहेत हे गावठी कट्टे कोणाला विकणार होते तसेच हे कट्टे कुठे बनवले गेले याची माहिती पोलीस तपासात पुढे येईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे( फोटो -पिस्तुल्या )Post a Comment

0 Comments