'बाळासाहेब भुजबळ' : राजकीय - सामाजिक क्षेत्रात निष्ठेने अखंड काम करणारा कार्यकर्ता - किशोर डागवाले

'बाळासाहेब भुजबळ' : राजकीय - सामाजिक क्षेत्रात निष्ठेने अखंड काम करणारा कार्यकर्ता - किशोर डागवाले

वेब टीम नगर :  राजकीय - सामाजिक क्षेत्रात निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता कसा असावा अशा वेळी जी मोजकी नाव आठवतात त्यात बाळासाहेब भुजबळांच एक नाव आहे.आपल्या मराठी भूमीत आपल्या संस्कृतीत अनेकांचे उच्च विचार, सेवाभावी वृत्ती आहे  अशांच्या सामाजिक कार्याचा वसा जणू श्री भुजबळ अखंड व अविश्रांत पणे चालवत असून त्यांना विविध पक्ष राजकारणी व त्यापलीकडेही सहकारी लाभले आहेत.अशा व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस छोटे खानी  सोहळ्यात जरी होत असला तरी त्यामागची भावना , कृतज्ञता मोठी आहे.असे गौरवोद्गार नगर महापालिकेचे माजी सभागृहनेते व भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले यांनी काढले.ओबीसी व्ही.जे.एन.टी जनमोर्चा चे नगर शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.  सुदर्शन गोरे यांनी कृत्रिम दंतरोपण - रुट कनाल कॅप व मोफत दंतरोग तपासनी शिबीर आयोजित केले होते.या शिबीराचे उद्घाटन व श्री भुजबळ यांचा सत्कार श्री डागवाले यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. 

ओबीसी जनमोर्चा  आणि जागरूक नागरिक मंच या दोन संघटना राजकीय नाहीत. एक समाजाच्या तर मंच हा नगरकरांच्या हक्कासाठी झगडत आहे.  प्रश्न मांडताना कोणी दुखावेल, रागावेल किंवा त्यामुळे आपले वैयक्तिक नुकसान होईल याची पर्वा न करता निस्वार्थी व समाजहित समोर ठेवून आम्ही काम करतो आणि कामातून नागरिकांना ज्या सुविधा प्राप्त होतात ते समाधान मोठे आहे.या कार्यातून समाजात जागरूकता निर्माण करणे व निस्वार्थीपणे किमान नागरी सुविधा आणि विकासासाठी नगरकरांनी पुढे यावे एवढीच अपेक्षा आहे.भुजबळ यांचे राजकीय आणि जनमोर्चात जसे सेवाभावी काम आहे तसे जागरूक मंच त्यातही ते सहभागी आहेत.त्यामुळे भुजबळांशी आमचे ऋणानुबंध कायम आहेत असे जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी सांगितले.

याप्रसंगी युवा नेते अजय चितळे  आपल्या भाषणात म्हणाले,प्रभागात काम करताना मला भुजबळांसारख्यांच्या  कार्याचा आणि मार्गदर्शनाचा लाभ होत असल्याने सेवाभावी वृत्ती जोपासण्याचा प्रयत्न नकळत होतो.तर श्री नामदेव मंदिर व समाज ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे यावेळी म्हणाले जनमोर्चा संघटनेमुळे भुजबळ सहकारी झाले. त्यांच्याबरोबर काम करताना समाजाचे प्रश्न आणि संघटन कसे करावे आणि आमच्याकडूनही कसे काम करून घ्यावे असे चांगले अनुभव मिळाल्याने अनेक मित्र प्राप्त झाले. 

याप्रसंगी भाजपा नगर महिला अध्यक्षा सौ.रेखा विधाते, भाजपा ओबीसी मोर्चा चे शहर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, भिंगार काँग्रेसचे कार्याध्यक्ष शामराव वागस्कर, जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक सुनील भिंगारे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, जनमोर्चा सचिव अभिजीत कांबळे, बारा बलुतेदार महासंघाच्या महिला शहराध्यक्षा अनुरिता झगडे, सौ वैशाली उदावंत, राजसाई गोल्ड निधीचे  संचालक राजेंद्र पडोळे,जागरूक नागरिक मंचाचे कैलास दळवी, विश्व हिंदू परिषदेचे गजेंद्र सोनवणे, काँग्रेस उपाध्यक्ष सुभाष रणदिवे, रावसाहेब काळे, भाजपा ओबीसी मोर्चा सरचिटणीस पप्पू पावले, सुनील कुलकर्णी,बी यु  कुलकर्णी, श्री ठोकळ सर, श्री गरड सर, प्राचार्य दुगड सर, दीपक दहेकर आदि मान्यवराची समयोचित भाषणे झाली.उपस्थित मान्यवरांसहीत सहकार्यांनी  श्री भुजबळ व  माजी नगरसेविका तथा नगर पालिका पाणी समितीच्या माजी सभापती सुनंदा भुजबळ यांचा शाल, बुके, फेटा, बांधून सत्कार केला.यात नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा  बाराबलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, शहराध्यक्ष शामराव औटी आदींचा यात समावेश होता.   

 सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब भुजबळ म्हणाले सत्कार आणि स्तृतीने मी भारावलो तरी मी काल जसा होतो तसा आज आणि उद्याही तसाच असेल.  आपण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या कामाचा उल्लेख करून काम लहान असेल पण त्यामागची भावना आपण लक्षात आणून दिली.हे सर्व अनुभवताना समाजात आज आपल्या सारख्या सुज्ञ,सुसंस्कृत आणि सेवाभावी वृत्ती,सत्यता टिकून आहे याचा हा पुरावा आहे.मी आभार मानण्यापेक्षा आपल्या ऋणात राहू इच्छितो आणि यापुढेही आपण असेच सहकार्य एकत्र येऊन सर्वांना करू असे सांगितले.  याप्रसंगी राजसाई गोल्ड निधी लिमिटेडच्या वतीने उपस्थित शिबिरातील सहभागी रुग्णांना व शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या  उपस्थितांना 'ज्ञानेश्वरी अभंग-सिद्धांत सार' हा लघुग्रंथ देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.डॉ.सुदर्शन गोरे यांनी शिबिरात ५१ रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना मोफत औषधे दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजेश सटाणकर यांनी केले तर आभार राजेश बाठीया यांनी मानले.

Post a Comment

0 Comments