१७ वर्षीय मुलीनं रेल्वसमोर उडी घेत संपवलं जीवन

१७ वर्षीय मुलीनं रेल्वसमोर उडी घेत संपवलं जीवन

वेब टीम अकोला : अकोल्यातील गुडधी रेल्वे गेट चौकीच्या परिसरातच रेल्वेखाली उडी घेत अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. श्रुती नाजुकराव डांगे (वय १७, रा. मोठी उमरी, अकोला) असं या आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुडधी रेल्वे गेट बंद असताना श्रृती डांगे हिने आपली दुचाकी रेल्वे गेटसमोर लावली आणि रेल्वे येत असताना ती रूळावर जाऊ उभी राहिली. या दरम्यान गेटसमोर असलेल्या नागरिक आणि रेल्वे गेट मॅन यांनी आरडाओरड करून मुलीला बाजूला होण्याचं आवाहन केलं. मात्र तिने लोकांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं आणि रेल्वे रूळावरून हटण्यास नकार दिला. त्यानंतर रेल्वेने चिरडल्याने श्रृतीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती सिव्हिल लाइन पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुलीने आणलेल्या दुचाकीच्या आधारे तिची ओळख पटवण्यात यश आलं आहे.

वाढदिवसाच्या आदल्या दिवशी संपवलं जीवन

श्रुतीचे वडील निशांत बँकेत कार्यरत असून कुटुंब मोठी उमरी भागातील शाळेजवळ भाड्याच्या खोलीत राहते. श्रुतीचा १३ जून रोजी वाढदिवस आहे. मात्र वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच श्रृतीने जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या आत्महत्येची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांना मोठा धक्का बसला.

आत्महत्येचं अद्याप कारण अस्पष्ट

श्रुतीच्या आत्महत्येचं कारण अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाही. तिचे नातेवाईक सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात पोहोचले असून दुपारपर्यंत तिच्यावर शवविच्छेदन प्रक्रिया पार पडणार आहेत. या प्रकणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments