पुण्यातून तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण

पुण्यातून तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण 

शेंडगेवाडीतून महिलेला मुलीसह ताब्यात घेतले 

वेब टीम  पुणे : दि.23 मे 2022 रोजी फिर्यादी मयुरी विनोद गायकवाड वय 23 वर्षे रा. ढोलेपाटील रोड, पुणे यांची ३ वर्षाची मुलगी दि.23 मे 2022 रोजी दुपारी 1:30 वा. ते 3:00 वा.चे दरम्यान कॅन्टोन्मेट सहकारी बँक लि.ढोले पाटील रोड शाखा शेजारील सार्वजनिक रोड पुणे येथुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे संमती शिवाय कायदेशिर रखवालीतुन पळवून नेले.त्यावरुन कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन,पुणे शहर येथे भा.द.वि.क.३६३  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास चालु असताना दि.30 मे 2022 रोजी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे पोसई अमोल घोडके व त्यांचे पथक सदर गुन्ह्याचे तपास कामी 

     श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे आले असता त्यांचेकडील असलेले सीसीटीव्ही फुटेजच्या माहीती आधारे सदरचा गुन्ह्यातील आरोपी महीला ही शेंडगेवाडी शिवारातील असल्याची गुप्त बातमीदारा मार्फत माहीती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली.सदर माहीतीचे अनुशंगाने त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ सुचना दिल्या.त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण पथकाने संशयित महीला नामे उषा नामदेव चव्हाण वय ३५ वर्षे रा.शेंडगेवाडी ता.श्रीगोंदा हीस ताब्यात घेतले. असता तिचेकडे केलेल्या चौकशी मध्ये सदर गुन्ह्यातील अपहरण करण्यात आलेली ३ वर्षाची मुलगी मिळुन आल्याने त्यांना कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे पोसई अमोल घोडके व पोलीस पथक यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक मनोज पाटील,मा.अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव  यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.रामराव ढिकले,पोसई समीर अभंग, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके,सफौ अंकुश ढवळे,पोना गोकुळ इंगवले,पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे,पोकॉ दादासाहेब टाके,पोकॉ अमोल कोतकर तसेच पोना घोडके,पोना जढर,मपोकॉ राऊत श्रीगोंदा पोलीस व कोरेगाव पार्क पोलीस ठाणे यांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments