तारकर्लीजवळ पर्यटकांची बोट बुडली; दोन पर्यटकांचा मृत्यू

तारकर्लीजवळ पर्यटकांची बोट बुडली; दोन पर्यटकांचा मृत्यू

वेब टीम सिंधुदुर्ग: मालवणमधील तारकर्ली येथे पर्यटकांची बोट बुडाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेमध्ये दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. या बोटीमध्ये एकूण २० पर्यटक होते. त्यापैकी १६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याचे समजते.

बोट बुडत असल्याचं दिसताच स्थानिकांना तातडीने मदतकार्य सुरु केलं. स्कुबा डायव्हिंगवरुन परतत असतानाच या बोटीचा अपघात घडला. बोटीमधील सर्व पर्यटक मुंबई आणि पुण्याचे असल्याचे समजते

जय गजनान नावाच्या बोटीचा स्कुबा डायव्हिंगवरुन समुद्रकिनाऱ्याकडे परतताना अपघात झाला. या अपघातानंतर बोट बुडू लागली असताना किनाऱ्यावरील स्थानिकांबरोबरच तेथे उपस्थित असणाऱ्या सुरक्षा यंत्रणांमधील कर्मचारी तातडीने हलचाल करुन बोट बुडत असणाऱ्या ठिकाणी बोटींच्या मदतीने पोहोचले. बोटीवरील २० पर्यटकांपैकी १६ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. मात्र दोन जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. मृतांच्या नाका तोंडामध्ये मोठ्याप्रमाणात पाणी गेल्याने गुदमरुन त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं आहे. अन्य दोन पर्यटकांना वाचवण्यात यश आलं असलं तरी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं टीव्ही ९ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

नेमक्या कोणत्या कारणामुळे अचानक ही बोट बुडली यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नसली तर पर्यटनाच्या कालावधीमध्ये हा अपघात झाल्याने पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्याप्रमाणामध्ये तारकर्लीला पर्यटक येतात. मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये स्कुबा डायव्हिंगसाठी तारकर्ली हे हॉट फेव्हरेट डिस्टीनेशन ठरत आहे. मात्र आता या अपघातामुळे येथील पर्यटनाला धक्का पोहचू शकतो अशी चर्चा सुरु झालीय.

Post a Comment

0 Comments