२० जून रोजी पेंशन अदालतीचे आयोजन

२० जून रोजी पेंशन अदालतीचे आयोजन

वेब टीम नगर : ३० जून, रोजी संपणाऱ्या सहामाहीसाठी विभागीय पोस्टल पेन्शन अदालत सोमवार, २० जून रोजी १२ वाजता वरिष्ठ अधीक्षक, डाकघर, अहमदनगर विभाग, अहमदनगर-४१४००१, प्रधान डाकघर इमारत, दुसरा मजला या ठिकाणी आयोजित केली आहे. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या पेन्शनर तक्रारदारास स्वखर्चाने यावे लागेल. या अदालतीमध्ये फक्त पोस्टाच्या पेन्शन विषयक तक्रारींचा विचार केला जाईल.

तक्रारीबाबतचा लेखी अर्ज संबंधित कागदपत्रांसहित उपरोक्त कार्यालयात ३ जून, रोजी किंवा तत्पूर्वी मिळतील अशा तऱ्हेने दोन प्रतीसह पाठवावा. या तारखेनंतर आलेल्या तक्रारींचा पेन्शन अदालतमध्ये समावेश केला जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे वरिष्ठ अधीक्षक, डाकघर, अहमदनगर विभाग, अहमदनगर यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे. Post a Comment

0 Comments