घरफोड्या करणाऱ्या टोळीचा म्होरक्या गजाआड

घरफोड्या करणाऱ्या टोळीचा म्होरक्या गजाआड 

दोन लाख बेचाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

वेब टीम नगर : कोतवाली पोलिसांनी दिवसा घरफोडी करणा-या टोळीचा म्होरक्या जेरबंद केला असून त्याच्याकडून सुमारे सहा तोळे सोने व ९२० ग्रॅम वजनाची चांदी असे एकुण २,४२,६००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

२१ मे रोजी केडगाव भुषननगर येथील पुजा मनोज बडे रा यांच्या घरी २० मेच्या पहाटेच्या दरम्यान चोरी झाली असल्याची फिर्याद नोंदवली होती पूजा बडे आणि त्यांचे कुटुंबीय देवदर्शानकरीता राहते घरास कुलुप लावुन जेजुरी येथे गेले होते.त्यावेळी अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलुप तोडुन आमच्या घरात जाऊन गोदरेज कपाटातील सोन्या-चांदीचे ३,०३,१००/- रुपये किंमतीचे दागीने चोरून नेले होते.

सदर गुन्ह्याचा तपास करत असतांना पोलीस निरिक्षक  संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हा हा फिर्यादी यांचेवर पाळत ठेवुन झालेला असुन घराची माहीती देणारे आरोपी हे अहमदनगर येथील असुन घरफोडी करणारे आरोपी हे पुणे येथुन आलेले होते अशी प्राथमिक माहीती मिळाल्यावरुन आरोपींचा शोध सुरू होता त्यासाठी दोन पथके नेमण्यात आले होते.

नगर मधील पथक शोध घेत असताना चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल विकण्या करीत एक आरोपी गंजबाजार येथे येणार असलेबाबत माहीती मिळाल्याने पोलिसांनी त्यात  ठिकाणी सापळा लावुन एका संशयीत माणूस सोने व चांदी विक्री करणे कामी सराफ बाजारात फिरताना मिळुन आला असता त्यास पोलीस पथकाच्या मदतीने ताब्यात घेवून त्याची चौकशी करून तपासणी केली असता त्याच्याकडे केडगाव येथील गुन्ह्यातील दागिने आढळून आले त्यांनी स्वतःचे नाव अविनाश दिलीप क्षेत्रे नगर येथील नतर पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा आपल्या साथीदारांसह केला असून त्याचे साथीदार पुणे येथून आले असल्याचे सांगितले असता त्याच्या साथीदारांच्या शोध घेण्यासाठी पुणे येथे एक पथक रवाना केले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा सपोनि रविंद्र पिंगळे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments