पिंपळगावचे पाणी यांनीच पळविले : बी.जे. देशमुख
वेब टीम अकोले : आमदार किरण लहामटे व गायकर यांनी बनवाबनवी चा धंदा आता बंद केला पाहिजेत्यांची दुटप्पी भूमिका पिंपळगाव लाभधारक व मूळा खोर्यातील जनतेच्या लक्षात आली आहे. एका बाजूला आमदारांनी पाणी पळवायचे आणि दुसऱ्या बाजूला गायकर यांना पुढे करून अंगलट आलं म्हणून सारवासारव करायची हा बनवाबनवी चा धंदा बंद करावा.
निवडणूक आल्यावर पिपळगावचे लाभधारक तुम्हाला जागा दाखवतील असे पिंपळगाव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पिंपळगाव संदर्भात मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्वतंत्र वेळा घेतली होती. कारण तालुक्यातील आमदारच निधी देऊन त्या ११ गावांना व तेवीस वाद्यांना ६५ लाखांचा पिंपळगावातून पाणी उचलण्या साठी यांनीच पत्र दिले. गायकर आणि लहामटे दररोज एकत्र असतात . मग गायकरांनी शेतकऱयांना का सांगितले नाही.
आठ दिवसांपूर्वी कोतुळ सह पिंपळगाव च्या लाभधारक गावातील सरपंच व प्रमुख लोकांची बैठक मी स्वतः घेतली तरुणांनी धरणावर आंदोलन सुरू केल्यानंतर सारवासारव करायलाही पुढे आले. अजितदादांच्या व जयंत पाटील यांच्या समोरील यांनी अप्पर एक टीएमसी आंबित ची मागणी केली व पाणी शिल्लक नसल्याने होत नाही हे माहित असताना केवळ बनवाबनवी सुरू आहे.
पिंपळगाव साठी तीव्र आंदोलन केल्याशिवाय नवीन पर्याय निर्माण होणार नाही असेही देशमुख म्हणाले पठार भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे ती योजना येथे राबवण्यासाठी आग्रही राहील यावर जनआंदोलन हाच एक पर्याय आहे
0 Comments