कोतवाली पोलिसांच्या कारवाईत रु १८,२५० रोख रक्कम हस्तगत

कोतवाली पोलिसांच्या कारवाईत रु १८,२५० रोख रक्कम हस्तगत

कोतवाली आर. टी .सी .पी. मोबाईल मधील डायल ११२ च्या कॉलद्वारे माहिती मिळताच कोतवाली पोलिसांची रेड मध्ये 11 जणांना अटक

वेब टीम नगर : कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना कोतवाली आर. टी .सी .पी. मोबाईल मधील डायल ११२ च्या कॉलद्वारे पहाटे ३:३० वाजता माहिती मिळाली की , अहमदनगर शहरातील कायनेटीक चौकात हायवे चाय टपरीच्या पाठीमागील बाजूस काही इसम जमुन पैसे लावुन तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळत आहेत  अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने 

कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे पोलीस उपनिरीक्षक व गजेंद्र इंगळे,सेक्टर नं . ३ चे  पोलीस कॉन्स्टेबल कुणाल खरात , पोकॉ मासळकर व गुन्हे शोध पथकातील रात्र गस्तचे पोलीस नाईक योगेश कवाष्टे , पोकॉ पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे,पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार,पोलीस कॉन्स्टेबल संदिप थोरात या पथकाने


बातमी ठिकाणी चाय टपरीच्या पाठीमागील बाजुस तिरट नावाचा पाहटे  ०४.०० वा चे सुमारास छापा टाकला तेथे बसलेल्या इसमांना पोलीसांची चाहुल लागताच त्यांनी त्यांचे हातातील सर्व पत्ते समोरील न्युज पेपर वर फेकले त्यावेळी खाली बसलेल्या इसमांना जागीच पकडुन त्यांना त्यांचे नाव ( १ ) साबीर असयुब शेख , वय -३८ वर्ष , रा . तखती दरवाजा , ता.जि अहमदनगर ( २ ) सचिन प्रभाकर परदेशी , वय ४२ वर्षे रा . संकल्प कॉलनी , बु - हानगर , ता.जि. अहमदनगर ( ३ ) सुरशे शिवदास ननवरे , वय -३८ वर्षे रा . आदर्श कॉलनी , गौतम नगर , कायनेटीक चौक , ता.जि. अहमदनगर ( ४ ) मोसीन इसा मुद्दीन शेख , वय ३२ वर्षे रा आशा टॉकीज , ता.जि. अहमदनगर ( ५ ) फिरोज खान सुलेमान खान , वय ५३ रा तखती दरवाजा , आशा टॉकीज , ता . जि . अहमदनगर ( ६ ) सोफीया रऊफ शेख , वय -३२ वर्षे रा फलटन चौकी , लाईन बाजार , ता.जि. अहमदनगर ( ७ ) जाहीद जाकीर शेख , वय -२७ वर्षे , रा इंडीय बेकरी जवळ , मुकुंद नगर , ता.जि. अहमदनगर ( ८ ) अक्षय सुनिल गायकवाड , वय- १ ९ वर्षे , रा शांतीनगर , सारस नगर , ता.जि. अहमदनगर ( ९ ) अमित बाळासाहेब चिंतामणी , वय -३० वर्षे , रा पावर हाऊस , तेलीखुंट , मिसाळ गल्ली , ता.जि. अहमदनगर ( १० ) जावेद पिरमहम्म्द सय्यद , वय २३ वर्षे , रा हनुमान मंदीरा मागे , गैरव नगर , फकीरवाडा , ता.जि.अहमदनगर ( ११ ) जिशांत राजु इनामदार , वय -३० वर्षे रा नावेद कॉम्पलेक्स , निव मुकुंदनगर , ता.जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले कोतवाली पोलिसांच्या पथकाने त्यांची अंगझडती घेतली. 

 त्यांचे कब्जात खालील वर्णनाचा व किमतीचा मुददे माल मिळुन आला तो , २१०० / - रु रोख रक्कम इसम नामे साबीर असयुब शेख याचे अंगझडतीत मिळुन आले . ११०० / - रु रोख रक्कम इसम नामे सुरशे शिवदास ननवरे याचे अंगझडतीत मिळुन आले ६०० / - रु रोख रक्कम इसम नामे सचिन प्रभाकर परदेशी याचे अंगझडतीत मिळुन आले १८०० / - रु रोख रक्कम इसम नामे मोसीन इसा मुद्दीन शेख याचे अंगझडतीत मिळुन आले . ३४०० / - रु रोख रक्कम इसम नामे फिरोज खान सुलेमान खान याचे अंगझडतीत मिळुन आले . ३१०० / - रु रोख रक्कम इसम नामे सोफीया रऊफ शेख याचे अंगझडतीत मिळून आले  ६०० / - रु रोख रक्कम इसम नामे जाहीद जाकीर शेख याचे अंगझडतीत मिळुन आले . ८०० / - रु रोख रक्कम इसम नामे अक्षय सुनिल गायकवाड याचे अंगझडतीत मिळुन आले . २५०० / - रु . रोख रक्कम इसम नामे अमित बाळासाहेब चिंतामणी याचे अंगझडतीत मिळुन आले . ९ ०० / - रु रोख इमस जावेद पिरमहम्म्द सय्यद यांचे अंगझतीत मिळुन आले १६०० / -रु रोख रक्कम इसम नामे जिशांत राजु इनामदार याचे अंगझडतीत ११ . १२ . २००० / - रु रोख रक्कम व अस्त व्यस्त फेकलेले पत्ते डावातील डावात मध्ये पडलेले १८,२५० / - रोख रक्कम एकुण येणे प्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा मुददेमाल व तिरट जुगाराचे साधनेवरील इसमांचे ताब्यात घेण्यात आले.

तरी आज दि .१६ / ०५ / २०२२ रोजी ०२.३० वा चे सुमारास अहमदनगर शहरातील कायनेटीक चौकात हायवे चाय टपरीच्या पाठीमागील बाजुस वरिल १ ते ११ इसम हे एकत्र बसुन तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळतांना रोख रक्कम व तरीट खेळ खेळणा - या लागणारे पत्ते या मुददे मालासह मिळुन आला आहे . त्यांचे विरुध्द कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप थोरात यांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम -१२ अ प्रमाणे कायदेशीर फिर्याद

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली

कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे पोलीस उपनिरीक्षक व गजेंद्र इंगळे,पोलीस कॉन्स्टेबल कुणाल खरात, पोलीस कॉन्स्टेबल मासळकर,पोलीस नाईक योगेश कवाष्टे,पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे,पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार,पोलीस कॉन्स्टेबल संदिप थोरात या पथकाने सदरची कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments