जोरात भजन वाजवल्याने तरुणाला बेदम मारहाण : उपचारादरम्यान मृत्यू

जोरात भजन वाजवल्याने तरुणाला बेदम मारहाण :  उपचारादरम्यान मृत्यू 

वेब टीम मेहसाणा : गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात एका मंदिरात लाऊडस्पीकरवर जोरात आरती वाजवल्याबद्दल एका तरुणाची हत्या करण्यात आली. गुजरातमधील मंदिरांमध्ये लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे हिंसाचाराची ही दुसरी घटना आहे.

मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ७ वाजता जोतना तालुक्यातील लक्ष्मीपुरा गावात ही घटना घडली. मृत जसवंतजी ठाकोर हे रोजंदारी मजूर होते. जसवंत यांचा मोठा भाऊ अजित ठाकोर यांनी पोलिसांना सांगितले की, दोघेही त्यांच्या घराजवळील मेलडी माता मंदिरात आरती करत होते. यावेळी लाऊडस्पीकरवर आरती सुरू होती. तेवढ्यात सदाजी ठाकोर, विष्णूजी ठाकोर, बाबूजी ठाकोर, जयंतीजी ठाकोर, जवनजी ठाकोर, विनुजी ठाकोर आले आणि म्हणाले की तुम्ही एवढ्या मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर का वाजवत आहात? आम्ही आरती करतो, असे अजितने सांगितले, त्यानंतर सदाजीने शिवीगाळ सुरू केली.यावर आक्षेप घेत सदाजीने सहकाऱ्यांना बोलावून घेतले. सर्वांनी आमच्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला.

या हल्ल्यात जसवंत आणि अजित गंभीर जखमी झाले. गंभीर अवस्थेत गावातील लोकांनी त्याला मेहसाणा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. जिथे जसवंतचा मृत्यू झाला. अजितच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरुवारी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अजितवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यापूर्वी 2 मे रोजी अहमदाबाद जिल्ह्यातील बावला तालुक्यात एका मंदिरात लाऊडस्पीकर वाजवल्याबद्दल 30 वर्षीय भरत राठोडला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणात आरोपी आणि पीडित हिंदू समाजातील दोन भिन्न जातींचे होते.

Post a Comment

0 Comments