बंगळूरात ७ शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची इमेल द्वारे धमकी

बंगळूरात ७ शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची इमेल द्वारे धमकी 

वेब टीम बेंगळुरू : बंगळुरूमधील 7 शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास धमकीचा मेल आल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळांमधून बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली. बेंगळुरू शहराचे पोलिस आयुक्त कमल पंत म्हणाले की, पोलिसांचे पथक या शाळांची चौकशी करत आहेत.

दोन शाळांमध्ये बॉम्ब सापडले नाहीत

बेंगळुरू पूर्वचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. सुब्रमण्यस्वर राव म्हणाले की, अशा ईमेल बहुतेक अफवा असतात, परंतु आम्ही ते गांभीर्याने घेत आहोत आणि कोणतीही संधी सोडत नाही. आतापर्यंत दोन शाळांमध्ये तपास पूर्ण झाला असून, तेथे बॉम्ब सापडलेले नाहीत.

यातील काही शाळांमध्ये परीक्षा सुरू होत्या. मुलांना परत घेऊन जाण्यासाठी पालकांना बोलावण्यात आले आहे. मात्र, परीक्षेत कोणताही गोंधळ झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस पथक ईमेलच्या स्रोताचाही तपास करत आहे.

ज्या मेलद्वारे शाळांना धमकी देण्यात आली आहे, त्यात लिहिले आहे - तुमच्या शाळेत खूप शक्तिशाली बॉम्ब पेरण्यात आला आहे. लक्ष द्या, तुमच्यासह हजारो जीव धोक्यात येऊ शकतात. याची तात्काळ पोलिसांना तक्रार करा. उशीर करू नका आता सर्व काही फक्त तुमच्या हातात आहे.

ज्या ७ शाळांना धोका निर्माण झाला त्या पुढील प्रमाणे 1. दिल्ली पब्लिक स्कूल, वरथूर 2. गोपालन इंटरनॅशनल स्कूल, महादेवपुरा 3. न्यू अकादमी स्कूल, मराठाहल्ली 4. सेंट व्हिन्सेंट पॉल स्कूल, 5. इंडियन पब्लिक स्कूल, गोविंदपुरा 6. एबेनेझर इंटरनॅशनल स्कूल, इलेक्ट्रॉनिक सिटी

Post a Comment

0 Comments