मार्च महिन्यातील तापमानाचे सर्व विक्रम मोडीत निघाले

मार्च महिन्यातील तापमानाचे सर्व विक्रम मोडीत निघाले 

वेब टीम नवी दिल्ली :  मार्च महिन्यातील तापमानाने मागील सर्व विक्रम मोडले आहेत, मार्च १९०१ पासून १२२ वर्षांतील हा भारतातील सर्वात उष्ण मार्च ठरला आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, ‘मार्च २०२२ ची मासिक सरासरी ३३.१ डिग्री सेल्सियस आहे. जी २०२१ मधील ३३.०९ डिग्री सेल्सियसचा मागील विक्रम मोडीत काढते.

IMD अधिकाऱ्यांनी सांगितले की, दीर्घकाळापर्यंत दुष्काळामुळे वायव्य भारतात उष्ण हवामान निर्माण झाले आहे. गुरुवारी दिल्लीच्या काही भागांमध्ये तीव्र उष्मा होता, तीन ठिकाणी कमाल तापमान ४१ अंशांच्या पुढे गेले.

३ ते ६ एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. देशातील बहुतांश भागात उष्णतेने लोक हैराण झाले आहेत. लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडणे टाळत आहेत.

देशभरातील तापमानही यंदाच्या उन्हाळ्यात सरासरीपेक्षा अधिक असणार आहे. यासाठी ‘ला निना’च्या स्थितीचा अभाव कारणीभूत ठरू शकते. ‘ला निना’ स्थितीमध्ये पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान ओसरते तर ‘अल निनो’ स्थितीमध्ये हे तापमान वाढते. लवकरच ‘ला निना’चा प्रभाव होणार आहे. त्यामुळे समुद्राचे तापमान वाढेल; मात्र ‘अल निनो’ निर्माण होणार नाही. तटस्थ ‘ला निना’मुळे उन्हाळय़ात देशभरातील किमान व कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सांगण्यात आले होते.


Post a Comment

0 Comments