जिल्हा बँक लेखापरीक्षण विभाग आगीबाबत संशय !

जिल्हा बँक लेखापरीक्षण विभाग आगीबाबत संशय !

वेब टीम नगर : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तिसर्‍या मजल्यावर असलेल्या लेखापरीक्षण विभागाला आज सायंकाळी आग लागली.आग लागल्याची माहिती मिळताच मनपा, एमआयडीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या तिसर्‍या मजल्यावर लेखापरीक्षण विभाग आहे. याच लेखापरीक्षण विभागाला आज सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमाराला अचानक आग लागली.

कर्मचार्‍यांनी याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. मनपाच्या अग्निशमन दल तात्काळ दाखल झाले. त्यानंतर एमआयडीसीचे अग्निशमन दलही दाखल झाले.

सुमारे एक ते दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीमध्ये बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लेखापरीक्षण विभागात सर्व वस्तू जळून खाक झालेल्या आहेत.या मजल्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालय सुद्धा असल्यामुळे त्या ठिकाणी आगीची झळ पोहोचली  आहे. मात्र त्या ठिकाणी नुकसान झाले नाही.

 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तिसर्‍या मजल्यावर असलेल्या लेखापरीक्षण विभागाला . आग लागल्याची माहिती मिळताच मनपा, एमआयडीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले .अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या तिसर्‍या मजल्यावर लेखापरीक्षण विभाग आहे. याच लेखापरीक्षण विभागाला आज सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमाराला अचानक आग लागली.दरम्यान या आगीबाबत संशय बळावत असून याची सखोल चौकशी करून दोषीं आढळल्यास कारवाई केली जाईल असे मत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी घटनास्थळी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments