‘तो’ गावठी कट्टा घेऊन फिरत होता अन ….

‘तो’ गावठी कट्टा घेऊन फिरत होता अन ….

वेब टीम नगर : श्रीरामपूर शहरात रेल्वे स्टेशनसमोर विनापरवाना बेकायदेशिर गावठी कट्टा व जिवंत काडतुस स्वतःजवळ बाळगुन फिरणार्‍या एकास पोलिसांनी अटक केली आहे.सचिन बाळू धुमाळ (वय३० ) रा.संभाजी चौक, अशोकनगर, ता. श्रीरामपूर असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल नहादेव नरवडे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक संजय सानप यांना एक संशयीत इसम हा स्वतःजवळ विनापरवाना बेकायदेशीर गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगून रेल्वे स्टेशन समोर येथे फिरत आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळाली. सानप यांच्या आदेशानुसर पोलीस पथक कारवाईसाठी रवाना झाले. पथक हे रेल्वे स्टेशन जवळ गेले असता, एक इसम रेल्वे स्टेशन समोर फिरत असलेला दिसून आला.तपास पथकाला पाहून सदर संशयित इसम पळून लागला. तातडीने या पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले.

सचिन बाळू धुमाळ रा.संभाजी चौक, अशोकनगर, ता. श्रीरामपूर असे या आरोपीचे नाव आहे. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला २५,५००रुपये किमतीचे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस मिळून आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments