लावणी सम्राज्ञी विजया पालव यांच्यावर जीवघेणा हल्ला

लावणी सम्राज्ञी विजया पालव यांच्यावर जीवघेणा हल्ला 

वेब टीम दिवे : महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विजया पालव यांच्यावर दिव्यात जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

या हल्ल्यात विजया रक्तबंबाळ झाल्या आहेत. संबंधित घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले.उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आलं आहे.



दरम्यान, विजया यांच्यावर हल्ला नेमका कुणी केला आणि त्यांच्यावरील हल्ल्यामागील नेमकं कारण सदनिकेचे मेंटेनन्सची रक्कम वाढवण्यात आल्याने त्यातून वादावादी झाल्याचे समजते .  

पण संबंधित घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. विजया पालव यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्रीची भूमिका देखील साकारली आहे.

त्यांच्या नृत्यकलेमुळे त्यांना लावणी सम्राज्ञी, लावण्यवती, लावणी क्वीन अशा अनेक नावांनी त्या ओळखल्या जातात. त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कार, बक्षिसे मिळाली आहेत.

त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी समोर आल्याने मराठी चित्रपट सृष्टीसह चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments