घासगल्ली अतिक्रमण प्रकरणी दीन दयाळ परिवाराचे निवेदन

घासगल्ली अतिक्रमण प्रकरणी दीन दयाळ परिवाराचे निवेदन 

वेब टीम नगर : कापड बाजारात व्यापाऱ्यावर अतिक्रमण केलेल्या गुंडांनी हल्ला व शिवीगाळ करत दमदाटी केली. असे प्रकार शहरातील विविध भागात सर्रास होत आहेत. तसेच गर्दीचा फायदा घेऊन महीलांची छेडछाड करणे, चेन स्नाचींगचे प्रकारही वाढले आहेत.

बाजारपेठेत अतिक्रमण केलेल्या गुंडांची दहशत असून व्यापाऱ्यांवर जीव घेणे हल्ले करत आहेत. या गुंडांना पोसणारे व त्यांचा हफ्त्यावर जगणारे समाज कंटक तथागत समाजसेवक ह्यांनी व्यापाऱ्यांचे जगणे मुश्कील केले आहे. प्रत्येक दुकाना समोर केलेल्या अतिक्रमणा मुळे व्यापाऱ्यांना दुकान चालविण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

त्यामुळे नगर शहरातील व्यापार संपेल अशी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नगर शहरातील व्यापारी व  बाजारपेठ वाचवण्यासाठी यापुढील काळात असे हल्ले होवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने त्वरित अतिक्रमण करण्याऱ्यांवर कडक कारवाई करावी.

जर मनापा प्रशासनाने आजच अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली नाहीतर दीनदयाळ परिवार बाजारपेठेत आमरण उपोषण करेल, असा इशारा दीनदयाळ परिवाराचे संस्थापक वसंत लोढा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनास व्यापारी व सामाजिक संघटनांनी आत्ता पर्यंत अनेक वेळा तक्रार देऊन सुद्धा बाजारपेठेतील गुंडांवर काहीच कारवाई झालेली नाहीये.

अतिक्रमण केलेल्यांनी बनावट व स्वंघोषित संघटना तयार करुन त्या नावाखाली पोलिस प्रशासन व महानगरपालिकेची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्वरित बाजारपेठेमधील गुंडांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

Post a Comment

0 Comments